तंत्रशिक्षण मंडळाच्या उन्हाळी परीक्षेत टी.बी.गिरवलकर पॉलिटेक्निकचे यश
निकालात मुलींची बाजी ; गणितात मिळविले शंभर गुण

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
येथील महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्था संचलीत टी.बी.गिरवलकर पॉलिटेक्निकच्या, विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाने घेतलेल्या उन्हाळी परीक्षा-२०२५ मध्ये उज्ज्वल निकालाची परंपरा कायम ठेवत दैदीप्यमान यश संपादन केले. त्यामध्ये गणित विषयात अंकिता हाके, योगेश्वरी जाधव आणि शुभ्रा हालगे या विद्यार्थीनींनी १०० पैकी १०० गुण घेऊन स्पृहणीय यश संपादन केले आहे. कॉम्प्युटर इंजिनीअरींग शाखेचा निकाल ९८ टक्के, इलेक्ट्रिकल इंजिनीअरींग शाखेचा निकाल ९५ टक्के, मेकॅनिकल इंजिनिअरींग शाखेचा निकाल ९० टक्के, सिव्हिल इंजिनिअरींग शाखेचा निकाल ८० टक्के, ईलेक्ट्रॉनिक्स कॉम्प्युटर इंजि.शाखेचा निकाल ९५ टक्के लागला आहे.
प्रथम वर्ष कॉम्प्युटर इंजिनीअरींग शाखेतून अंकिता हाके (९४.१२ टक्के), योगेश्वरी गाढवे (९३.१८ टक्के), शुभ्रा हालगे (९२ टक्के), द्वितीय वर्ष कॉम्प्युटर इंजिनीअरींग शाखेतून समाधान छत्रे (९०.२४ टक्के), क्षितीजा आगळे (८९.७७ टक्के), वैभवी रांदड (८७.०६ टक्के), तृतिय वर्ष कॉम्प्युटर इंजिनीअरींग शाखेतून अभिषेक सुरवसे (९३.५४ टक्के), स्नेहल पवार (९१.७७ टक्के), बालाजी गायकवाड (९१.०६ टक्के), प्रथम वर्ष ईलेक्ट्रॉनिक्स कॉम्प्युटर इंजिनिअरींग शाखेतून गायत्री मुंडे (८५.६३ टक्के), अंजली धायतिडक (८२.२५ टक्के), अस्मिता गित्ते (७८.१३ टक्के), प्रथम वर्ष स्थापत्य इंजिनिअरींग शाखेतून आदित्य दराडे (७७.४४ टक्के), सुमित चटप (७३.८९ टक्के), आशिष पवार (६९.४४ टक्के), प्रथम वर्ष इलेक्ट्रिकल इंजिनिअरींग शाखेतून आदित्य औताडे (७६ टक्के), विशाल शितोळे (७५ टक्के), गौरी फुण्णे (७१.२९ टक्के), अभिषेक मुसळे (७१.२९ टक्के), द्वितीय वर्ष इलेक्ट्रिकल इंजिनिअरींग शाखेतून योगिता निळे (८०.८२ टक्के), पांडूरंग पवार (७५.७७ टक्के), वैष्णवी नागरगोजे (७२.९४ टक्के), तृतिय वर्ष इलेक्ट्रिकल इंजिनिअरींग शाखेतून मुक्ता बिडगर (८९.८९ टक्के), ओम भगत (८९.७८ टक्के), आकांक्षा मुंगळे (८९.२८ टक्के), प्रथम वर्ष मेकॅनिकल इंजिनिअरींग शाखेतून ओंकार रेणवकर (७८.५६ टक्के), रितेश घोरपडे (७५ टक्के), अभय खरटमोल (७४.२२ टक्के), द्वितीय वर्ष मेकॅनिकल इंजिनिअरींग शाखेतून ज्ञानेश्वरी सिरसाठ (८१.७८ टक्के), आदित्य चव्हाण (७७.७८ टक्के), सिद्धार्थ गवळी (७३.३३ टक्के), तृतिय वर्ष मेकॅनिकल इंजिनिअरींग शाखेतून मेघराज साठे (८३.३३ टक्के), संकेत डोंगरे (७६.४४ टक्के), वेदांत तट (७५ टक्के) या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अदीनाथ सांगवे, उपाध्यक्ष माधवराव पाटील चिंचोलीकर, सचिव माधवराव पाटील टाकळीकर, सहसचिव सुनिल मिटकरी, अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.आय.खडकभावी. कार्यवाहक प्राचार्य डॉ.एन.ए.रावबावले, तंत्रनिकेतनचे प्राचार्य लक्ष्मीकांत बगले, विभागप्रमुख व्हि.व्हि.कन्नुर, श्रीमती अंजली कुलकर्णी, कु.रेणुका डबीर, प्रा.व्हि.व्हि.रावबावले, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी केले आहे.