आवसगाव येथे चि. रामराजे साखरे यांची PSI पदी निवड झाल्याबद्दल सत्कार समारंभ
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार केज तालुका यांच्या वतीने सत्काराचे आयोजन

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज विशेष
केज प्रतिनिधी
आवसगावचे भुमिपुत्र चि . रामराजे गोवर्धन साखरे यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत PSI पदी निवड झाल्याबद्दल उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते सत्कार सोहळा संपन्न झाला व मा. श्री सुरेश तात्या पाटील व मा .आ. पृथ्वीराज साठे श्नी युवराज मगर यांनी परिक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल व पुढील यशस्वी वाटचालीसाठी आई वडिलांचा व गुणवंत भुमिपुत्राचा सत्कार करुन पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी मौजे आवसगाव येथील बहुसंख्य नागरिक गणेश मंदिर येथे उपस्थित होते.
सत्कार सोहळ्याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना चि रामराजे साखरे यांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देताना सांगितले की आपल्या आई वडिलांच्या स्वप्नांना पुर्ण करण्यासाठी मी दिवसरात्र अभ्यास करून हे यश संपादन केले असुन या यशाचे सर्व श्रेय माझ्या आई वडिलांना जाते
.या प्रसंगी सर्वांच्या सहकार्याने सदरील सत्कार सोहळा संपन्न झाला .