आपला जिल्हाआरोग्य व शिक्षणवैभवशाली महाराष्ट्र न्युज

आरोग्य सेवक अमोल लोंढे यांच्या रूपाने आम्हाला देव माणुस भेटला घाटे परिवाराने व्यक्त केल्या भावना

अमोल लोंढे यांच्या प्रयत्नाने 2,50,000 रू हॉस्पिटल मधील बिल माफ करण्यात आले

पिंपरी चिंचवड (पुणे) विशेष

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज सामाजिक विशेष

पिंपरी :प्रतिनिधी धाराशिव जिल्ह्यातील आव्हाड शिरपूर येथील राजश्री लक्ष्मण घाटे यांच्यावर डी वाय पाटील हॉस्पिटल पिंपरी चिंचवड येथे हृदयाचे शस्त्रक्रिया करण्यात आली.

घरची आर्थिक परिस्थिती बेताची होती, पेशंटला शस्त्रक्रिया करण्यासाठी 4,15,000 रुपये इतका खर्च येणार होता. ऑपरेशन करण्यासाठी डॉक्टरांनी त्यांना ऍडव्हान्स 3,50,000 भरण्यासाठी सांगितले, पेशंटचे पती लक्ष्मीकांत घाटे यांनी गावाकडून पाहुणे मंडळी करून पैसे जमा करून पेशंटचे ऑपरेशन करण्यासाठी ऍडव्हान्स जमा केला. ऑपरेशन शनिवार पहाटे करण्यात आले व दुपारी तीन वाजता पेशंटला वार्डात शिफ्ट करण्यात आले. नियती पुढे कोणाचेही चालत नाही. शनिवारी रात्री 1:45 राजश्री काटे यांनी अखेरचा श्वास घेतला. उर्वरित रक्कम भरण्यासाठी डॉक्टरांनी सांगण्यात आली व त्यानंतर प्रेत घेऊन जावे. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने आधीच पैसे पाहुणे रावळ्याहून जमा करून आणले होते. 2,50,000 हजार बिल भरायचे कसे हा प्रश्न घाटे यांच्या समोर उभा राहिला.

 

सामाजिक कार्यकर्ते व आरोग्य सेवक अमोल लोंढे यांच्याशी संपर्क साधला असता, अमोल लोंढे तातडीने डॉक्टर डी वाय पाटील हॉस्पिटल जाऊन डॉक्टरांचे प्रत्यक्ष भेट घेऊन वरील उर्वरित रक्कम माफ करण्याची विनंती केली, डॉक्टरांनी त्यांना प्रतिसाद दिला नाही, अमोल लोंढे यांनी मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री यांच्या पी एस सी फोन वरती बोलून सर्व हकीकत सांगून बिल माफ करण्याची विनंती केली, मुख्यमंत्री आरोग्य सहायता निधी प्रमुख मंगेश चिवटे यांनी डॉक्टर डी वाय पाटील हॉस्पिटलशी संपर्क करून बिल माफ करण्याचे सांगितले व पत्र पाठवण्यात आले. डॉक्टर डी वाय पाटील हॉस्पिटल मधून घाटे यांना फोन आला व आपले बिल माफ करण्यात आले आहे.प्रेत घेऊन जा असे सांगण्यात आले. अमोल लोंढे यांच्या रूपाने आम्हाला देव माणूस भेटला असे घाटे यांनी भावना व्यक्त केली.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.