आपला जिल्हाराजकीयवैभवशाली महाराष्ट्र न्युजसामाजिकसांस्कृतिक

गोरगरिबांच्या मदतीला धावून जाणारे जन विकास परिवर्तन आघाडीचे प्रमुख हारून भाई इनामदार

गोरगरिबांची दिवाळी केली गोड

सामाजिक विशेष

केज प्रतिनिधी
केजमध्ये एकमेव आमचा नेता आहे तो जनविकास परिवर्तन आघाडीचा नेता हारून भाई इनामदार अशी चर्चा केज वासीय करत आहेत ते काही चुकीचे नाही.ज्या ज्या वेळेस आम्हा गोरगरीब जनतेला मदतीचा आणि मायेचा हात देणारा नेता हारून भाई इनामदार आहे . या दिवाळी मध्ये ही गोरगरीब ,कष्टकरी जनतेची दिवाळीला मिठाई वाटून गोड केली.
गेल्या दोन वर्षात कोरोणा सारख्या महामारी मध्ये ही हारून भाई इनामदार रस्त्यावर उतरून गोरगरिबांच्या मदतीला धावून आले ते सर्व केज वासीयांनी पहिलेच आहे .गोरगरीब ,कष्टकरी, जनतेला अन्न धान्य , किराणा किट वाटप करून मदतीचा हात दिला होता. कोणाला जर हॉस्पिटलमध्ये बेड मिळाले नाही तर त्या ठिकाणी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष फोन करून कोरोनाच्या रुग्णांना बेड मिळवून देऊन अनेकांचा जीव वाचवला आहे या सारख्या मोठमोठ्या कार्य करणाऱ्या हारून भाई इनामदार याना जनता विसरणार नाही हे ही जनतेने नगरपंचायत च्या
निवडणुकीतून दाखवून दिले .

प्रत्येक सणाला हारून भाई ची मदत

लहानमोठ्या सनाला गोरगरिब कष्टकरी , मजूर , यांना सणानिमित्त काही ना काही मदत हारून भाई करत असतात या ही वेळी हारून भाई आपणास काहीं ना काही मदत करतील अशी आशा गोरगरिबांना लागली होती ती आशा हारून भाईनि या दिवाळी मध्ये मिठाई वाटून गॉड केली त्यामुळे गोरगरीब ,कष्टकरी,मजूर यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता. या वेळी नगरविकास परिवर्तन आघाडीचे प्रमुख हारुण भाई इनामदार,केजच्या नगराध्यक्षा सौ.सीताताई बनसोड,केज नगरपंचायतचे गटनेते राजू भाई इनामदार, नगरसेवक सुमित बप्पा शिंदे, जफरभाई,महेश जाजू, मोहसीनभाई इनामदार, अमीरभाई इनामदार, एजाजभाई,असिफभाई आणि जनविकास परिवर्तन आघाडीच्या कार्यकर्त्यासह महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दिवाळीच्या सणाला गोरगरिबांच्या दिवाळीला हारून भाई इनामदार यांनी मिठाई देऊन दिवाळी गोड केल्यामुळे जनतेने हारून भाई इनामदार यांना धन्यवाद दिले .

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.