शिवसंग्रामच्या वतीने केज तालुक्यातील शेतकऱ्यांना तत्काळ सरसकट पीक विमा व आग्रीम नुकसान भरपाई देण्यात यावी यासाठी प्रशासनास निवेदन
शिवसंग्राम सदैव शेतकऱ्यांच्या हितासाठी तत्पर - युवक जिल्हाध्यक्ष रामहरी मेटे

शिवसंग्राम शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रमक…!
केज /बीड प्रतिनिधी
शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक अध्यक्ष लोकनायक मा.स्व आमदार विनायकरावजी मेटे साहेब यांच्या प्रेरणेने केज तालुका शिवसंग्रामच्या वतीने आज शिवसंग्रामचे बीड जिल्हा युवक अध्यक्ष रामहारी मेटे यांच्या नेतृत्वात ,शिवसंग्राम केज तालुका अध्यक्ष नामदेव गायकवाड , केज तालुका युवक अध्यक्ष अमोल पोपळे यांच्या नियोजनात तसेच शिवसंग्रामचे जेष्ठ नेते लिंबराज वाघ , महिला आघाडी अध्यक्षा अॅड मनिषाताई कुपकर , युसुफ वडगाव सर्कलचे शिवसंग्रामचे नेते , डॉ उत्तम खोडसे , युवक जिल्हा सरचिटणीस गणेश खांडेकर , शिवसंग्राम पदाधिकारी बाळासाहेब गलांडे , मा. बाजार समितीचे संचालक शिवाजी वाघमारे , महिला आघाडी जिल्हा सरचिटणीस साक्षाताई हंगे ,केज तालुका महिला आघाडी अध्यक्षा तेजश्रीताई खामकर , केज शहराध्यक्ष शिवसंग्राम अशोक कदम तसेच शिवसंग्रामचे पदाधिकारी युवा नेते शिवसंग्राम बाळासाहेब चाळक , जेष्ठ नेते कुरुंद तात्या , प्रवीण चाळक , शिवसंग्राम मिडिया सेलेचे अध्यक्ष दिपक कोल्हे , डॉ राहुल शिंदे , प्रकाश रोमण , बिकड्ड संदिप , बिकड्ड विष्णु , यादव उत्रेश्वर , तुषार मेटे ,जगताप तानाजी , शयाज इनामदार , या शिवसंग्राम पदाधिकारी यांच्या वतीने केज तालुक्यातील सर्व मंडळींतील शेतकऱ्यांवर ओढवलेल्या संकटाला मदत केली पाहिजे जेणेकरून नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीपोटी शासनाने तत्काळ तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट पीक विमा व आग्रीम नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी केज तहसीलदार यांना शिवसंग्राम केज तालुक्याच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली असुन केज तालुक्यातील नांदुरघाट , युसुफवडगाव , विडा, ,बनसारोळा,आडस , या महसूल मंडळे २५% पीक विमा व आग्रीम नुकसान भरपाई पासून वगळण्यात आली आहेत .
पावसाचा खंड पुर्ण तालुक्यात पडला असताना केज तालुक्यातील काही मोजक्या मंडळांना पीक विमा व आग्रीम नुकसान भरपाई जाहीर केली आहे ही केज तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बाबतीत अन्याय कारक बाब आहे , तालुक्यातील शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी करण्यासाठी न सांगता हि ई-पीक पाहणीची अट पुर्णंता रद्द करुन न्याय देण्यात यावा. व केज तालुक्यातील सर्वच महसूल मंडळातील पिकांचे नुकसान झाले आहे हि बाबा लक्षात घेऊन केज तालुक्यातील सर्व महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पीक विमा व आग्रीम नुकसान भरपाई देण्यात यावी या मागणीसाठी आज 15 सप्टेंबर रोजी केज तालुक्यातील शेतकऱ्यांसह शिवसंग्रामच्या वतीने तहसील कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली असुन पुढील आठ दिवसांत पीक विमा व आग्रीम नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली नाही तर 25 सप्टेंबर रोजी आपल्या कार्यालयाच्या समोर रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचे पदाधिकारी यांच्या वतीने निवेदनावर नमुद करण्यात आले आहे .