ऐकावं ते नवलच, महिनाभरानंतर डॉक्टरांनी काढला शस्त्रक्रिया करून हातातील लाकडाचा तुकडा
आरोग्य विशेष

बीड /प्रतिनिधी-शहाजी भोसले
महिनाभरापासून
हातात अतीव वेदना, अनेक तपासण्या
केल्या, डॉक्टरांना दाखविले, गोळ्या घेतल्या
पण तरीही काहीच फरक पडेना. हातातील
कळा तर थांबायचं नाव घेईनात, काय कराव या विचारतून मोठया शहरांत एकदा डॉक्टरांना दाखवावं असं वाटलं पण तेवढ्यात कोणाकडून तरी शहरात नव्याने सुरु झालेल्या वेलनेस हॉस्पिटलबदल माहिती मिळाली. त्यामुळे एकदा येथेही दाखवू आणि नाहीच फरक पडला तर छत्रपती संभाजीनगर किंवा पुण्याला जाऊ या विचारातून आलेला रुग्ण डॉक्टरांना सर्व घडलेला प्रकार सांगतो त्यानंतर त्या रुग्णाच्या हाताची सोनोग्राफी करायला लावतात अन तेंव्हाच जे घडतं ते खरच नवल करण्यासारखं आहे. कारण महिनाभरापासून हातात चक्क लाकडाचा तुकडा अडकल्यामुळे त्या रुग्णाला हा त्रास सुरु होता. डॉक्टरांनी शस्त्रक्रिया आणि अचूक निदान केल्यामुळे त्या रुग्णाला जीवदान लाभले आहे.
बीडमध्ये डॉ. अनिल पवार आणि डॉ. गणेश डोळे यांनी एकत्रित येऊन वेलनेस हॉस्पिटलची स्थापना केली. अल्पवाधित रुग्णांना चांगले उपचार आणि योजनेतून मोफत शस्रक्रियाचा लाभ मिळू लागल्याने बीडकरांसाठी हे सोईचे ठरू लागले आहे. विनोद गित्ते हे गेल्या महिन्यात झाडावरून पडले. त्यामुळे त्यांच्या हातात लाकडाचा मोठा तुकडा घुसला. यावेळी प्राथमिक उपचार करताना डॉक्टरांना ते लक्षात आले नाही. त्यामुळे हातात टाके घेऊन रुग्णाला घरी सोडण्यात आले. रुग्ण घरी गेल्यानंतर हातातील जखमी वरून भरून आली पण आतील वेदना मात्र थांबत नव्हत्या. त्यामुळ विनोद गित्ते यांनी काही डॉक्टरांना दाखवून एक्स रे,टू डी इकोसह अनेक तपासण्या केल्या. यातून काहीच कारण समोर येत नव्हते. मात्र त्रास वाढतच जात होता. त्यामुळे गित्ते हे मोठया शहरात उपचारासाठी जाणार त्याचवेळी त्यांना अस्थिरोग
तज्ञ डॉ. गणेश डोळे यांच्याबाबत माहिती मिळाली. त्यामुळे एकदा या डॉक्टरांना दाखवू नाही तर पुढील उपचारासाठी जाऊ या हेतूने ते डॉक्टर यांच्याकडे गेले. यावेळी स्रणाचा हात सुजल्यामुळे त्यांनी तातडीने हाताची सोनोग्राफी करायला सांगितले. यातून गित्ते यांच्या हातात एखादी वस्तू असल्याचे समोर आल्यानंतर डॉक्टरांनी शस्त्रक्रिया सुरु केली आणि तेंव्हा सर्वानाच धक्का बसला. कारण हातातून एक मोठा लाकडाचा तुकडा बाहेर आला. ज्यामुळे रुग्णाच्या हाताला मोठी इजा होऊ शकत होती. महिनाभरापासून सुरु असलेला त्रास डॉ. गणेश डोळे यांनी योग्यरित्या ओळखल्यामुळे थांबला आणि मोठा अनर्थ टळला. डॉक्टरांच्या या कामगिरीबद्दल बीड शहरात मोठ्या
प्रमाणावर चर्चा ऐकण्यास मिळत आहेत.