स्वामी विवेकानंद विद्यामंदिरात गणेश उत्सवानिमित्त व्याख्यान संपन्न
सांस्कृतिक उपक्रम

वैभवशाली महाराष्ट्र न्युज
केज दि २(प्रतिनिधी)
केज शहरातील स्वामी विवेकानंद प्राथमिक विद्यालयात गणेश उत्सवानिमित्त शुक्रवार रोजी व्याख्यान कार्यक्रम घेण्यात आला.कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ हनुमंत सौदागर, प्रमुख वक्ते ह भ प प्रमोद महाराज पवार,मुख्याध्यापक व्ही एस शितोळे आदींची होती.
यावेळी बोलतांना ह भ प पवार म्हणाले विद्यार्थ्यांनी गुरुजनांवर श्रद्धा ठेवून अध्ययन करावे.ज्ञान ही सर्वात मोठी साधना आहे असे मत व्यक्त केले.अध्यक्षीय समारोपात विद्यार्थ्यांनी कृतीशीलता जपावी असे मत डॉ सौदागर यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्तविक चौरे आर यु यांनी केले आभार चोले बी एस यांनी केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी सहशिक्षक कापसे ए बी ,जी जे भालेकर, सूर्यवंशी एस बी,शेप आर बी, शरद वनकळस , श्रीमती डांगे,श्रीमती शिंदे,श्रीमती कोठावळे,आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.