वडवणीचे भूमिपुत्र डॉ. हनुमंत कुरकुटे यांचा जन्मभूमीत सत्कार संपन्न
गांधी विचारांची प्रासंगिकता संदर्भ "हिंद-स्वराज" हे पुस्तक नुकतेच पुणे येथे प्रकाशित

भुमिपुत्र सन्मान विशेष
वडवणी :- प्रतिनिधी
वडवणीचे भूमिपुत्र तथा सध्या संगमनेर नगरपालिका कला, दा. ज. मालपाणी वाणिज्य व ब. ना. विज्ञान (स्वायत्त्य) महाविद्यालय, संगमनेर येथे सहाय्यक प्राध्यापक पदावर कार्यरत असलेले डॉ. हनुमंत कुरकुटे यांचा सत्कार वडवणीकरांच्या वतीने करण्यात आला. डॉ. हनुमंत कुरकुटे लिखित ,गांधी विचारांची प्रासंगिकता संदर्भ “हिंद-स्वराज” हे पुस्तक नुकतेच पुणे येथील गांधी भवन येथे मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती युवक क्रांती दलाचे राज्य कार्यवाहक संदीप बर्वे यांची होती तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिध्द सामजिक कार्यकर्ते युवक क्रांती दलाचे अध्यक्ष आणि गांधी स्मारक निधीचे कुमार सप्तर्षी हे होते.
एवढ्या मोठ्या मान्यवरांच्या हस्ते व उपस्थितीमध्ये मोठ्या उत्साहात पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला याचा समस्त वडवणीकरांना अभिमान आहे.
डॉ.हनुमंत कुरकुटे हे उच्च शिक्षित असून त्यांचे शिक्षण त्यांनी राज्यशास्त्रातून एम. ए. पदवी संपादन केली असून पुढे नेट उत्तीर्ण होऊन ‘हिंद स्वराज्याची प्रसंगीता’ या विषयातून डॉ. बा.आं. म. विद्यापीठ औरंगाबाद येथून २००८ मध्ये एम.फील. ही पदवी प्राप्त केली तर ‘ हिंदस्वराज्याची ‘ प्रासंगिकता या विषयात स्वा. रा. ती. मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथून २०१२ मध्ये पीएचडी पदवी प्राप्त केली. तसेच सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे, येथे एम.फील व पीएच.डी (राज्यशास्त्र) या विषयासाठी ते मार्गदर्शक म्हणून देखील काम पाहतात. तर विविध नियतकालिके व दैनिकांमधून विविध विषयावर सातत्याने ते लेखन करतात. विविध व्याख्यानमालेच्या माध्यमातून व्याख्याते म्हणून आपला सहभाग नोंदवतात. कार्यरत असलेल्या महाविद्यालयातील राज्यशास्त्र व अर्थशास्त्र विषयाच्या अभ्यासक्रम निर्मिती प्रक्रियेत अभ्यास मंडळ सदस्य म्हणून त्यांचा सहभाग आहे. आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व राज्य स्तरावर झालेल्या विविध कार्यशाळा, परिसंवाद चर्चासत्र यात सहभाग नोंदवलेला असून शोधनिबंधाचे सादरीकरण व प्रकाशन झालेले आहे. असे हे डॉ. हनुमंत कुरकुटे अत्यंत अभ्यासू व्यक्तिमत्व असून विद्यार्थी व नवीन पिढीसमोर एक आदर्श आहेत. अश्या ह्या भूमिपुत्राचा दीपावली निमित्त गावी आले असता गावकऱ्यांच्या वतीने यथोचित शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी वडवणी नगरपंचायतचे प्रथम उपनगराध्यक्ष अंकुश वारे, कोष्टी परिषदेचे गणेश टकले, पीएसआय दिगंबर कुरकुटे, कॉ.लहू खारगे, रामेश्वर हेकर, पृथ्वीराज लांडे, पांडुरंग टकले आदी उपस्थित होते.