पत्रकार जगदीश शिंदे यांचा बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या वतीने सत्कार

परळी (प्रतिनिधी):- मराठी पत्रकार परिषद अंबाजाेगाई शाखेच्या वतीने आयोजित दर्पन व मूकनायक दिनानिमित्त जगदीश शिंदे यांना स्व. मुश्ताक हुसेन स्मृती पत्रकारिता पुरस्कार 2023 देऊन मान्यवरांच्या उपस्थितीत गाैरवण्यात आले होते. याच अनुषंगाने बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या वतीने दैनिक आदर्श गावकरी चे परळी तालुका प्रतिनिधी जगदीश शिंदे यांचा परळी शहरातील बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या परळी मध्यवर्ती कार्यालयात शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
….यावेळी तालुकाप्रमुख शिवाजी शिंदे, शहर प्रमुख वैजनाथ माने, तालुका सचिव विश्वनाथ राठोड, उप तालुका प्रमुख सोमेश्वर गीते, युवा सेना शहर प्रमुख गजानन कोकीळ, महिला आघाडी प्रमुख राठोड, उप तालुका प्रमुख सुंदर रवळे, उप शहर प्रमुख संजय डिगोळे, बालाजी खोसे, परमेश्वर बनसोडे, सचिन सोनवणे, आशुतोष शिंदे, शिरसाळा शहरप्रमुख कैलास कावरे, शिवराज गित्ते, अनिकेत माने आदि पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.