एक वाढदिवस असाही मा.शिवश्री अजित दादा धपाटे
माणुसकीचा आधार फाउंडेशन केज मा. शिवश्री अजितदादा धपाटे वाढदिवस

वाढदिवस विशेष
सध्या सर्वत्र धूम धडाक्यात वाढदिवस साजरा करण्याची क्रेज निर्माण झाली आहे लहानांपासून ते मोठ्या व्यक्तींपर्यंत मोठे मोठे खर्च करून साजरे करण्यात येत आहेत. अतिरिक्त सजावट, फुगे फोडणे, फटाके वाजवणे ,मेणबत्ती जाळणे ,असे खर्च करून वाढदिवस साजरे करण्याची सध्या चढाओढ निर्माण झाली आहे मात्र सामाजिक आत्मभान ठेवून सामाजिक उपक्रम राबवून वाढदिवस साजरा करण्याची प्रथा सध्या बंद झाली आहे
क्वचितच ही प्रथा आता सध्या पाहायला मिळत आहे
आज अजित चा 29 वा वाढदिवस एकीकडे मोठ्या प्रमाणात वाढदिवसावर होणारे अवाढव्य खर्च टाळत वाढदिवसानिमित्ताने शालेय साहित्य व खाऊ वाटप करण्याचा निर्धार अजित ने केला. अजित ने आपले मत आमचे गुरुवर्य गवळी सर यांना सांगितले असता . विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी माणुसकीचा आधार फाउंडेशन च्या टीमने वसुंधरा प्रा. मा.आश्रम शाळा केज येथे 12 नोव्हेंबर रोजी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य केळी बिस्किट खाऊ वाटप करण्यात आला त्यानंतर खाऊ वाटप कार्यक्रम उपजिल्हा रुग्णालय केज येथे रुग्णांना वाटप करण्यात आला. उपजिल्हा रुग्णालयातील खाऊ वाटप झाल्यानंतर केज मधील चिंचोली पाटी जवळ असलेले युवा ग्राम संचलित अक्षय बालकाश्रम येथे शालेय साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले यावेळी युवा ग्रामचे संचालक श्री. एच.पी. देशमुख सर यांनी त्यांच्या मार्फत होणारे सर्व सामाजिक कार्यक्रम सर्व रीतसर माहिती सांगितली .
व इतरही चर्चा त्यांच्यासोबत करण्यात आली या बालकांबरोबर वाढदिवस साजरा करताना बालकांना वाटप करण्यात आलेला खाऊ आणि शालेय साहित्य पाहून बालकांच्या चेहऱ्यावरील हास्य पाहून आमचा आनंद द्विगुणीत झाला आणि खरंच असा वाढदिवस करण्याचे आज सार्थक झाले.
आपणही आपला वाढदिवस अशा ठिकाणी साजरा करून आपल्या आनंदात सहभागी करून घेवू शकता.
या ठिकाणी वाढदिवस साजरा करण्यात खूप मोठा खर्च येत नाही तसेच झालेला खर्च या अनाथ एकटे गरीब आर्थिक दृष्ट्या दुर्बल बालकांसोबत वाढदिवस साजरा करून त्यांच्या आनंदा पुढे तो खर्च काहीच नाही……
आज फाउंडेशन चे आमचे सर्व मित्र मंडळ श्री.निलेश तोडकर डॉ.विवेक डोईफोडे,योगेश वैरागे, प्रताप वैरागे ,श्री.विकास गवळी सर, महावीर पटेकर, डॉ.निखिल भालेराव, अजितदादा धपाटे, अमर धपाटे, परमेश्वर बोबडे, कृष्णा सूर्यवंशी, राहुल पटेकर आदींनी दिवसभरातील कार्यक्रम पूर्ण करण्यास सहकार्य केले…
दिवसभराच्या शेवटी सर्व कार्यक्रम आटोपल्यानंतर आम्ही ही एक छोटे खाणी फाउंडेशन च्या वतीने अजित चा वाढदिवस साजरा केला त्याला पुढील आयुष्य सुख-समृद्धीचे, आरोग्यदायी, भरभराटीचे ,जावो, व असेच सत्कार्य त्याच्या हाताने घडो अशा शुभेच्छा दिल्या …….