सह्याद्री मराठी पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्षपदी डॉ जावेद शेख यांची निवड
राज्यकार्याध्यक्षपदी शहाजी भोसले यांची वर्णी

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज
महाराष्ट्र विशेष/ प्रतिनिधी
बीड / महाराष्ट्रातील पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी स्थापन झालेल्या सह्याद्री मराठी पत्रकार संघाच्या महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्षपदी बीड जिल्ह्याचे भुमिपुत्र तथा दैनिक संघर्षचे उपसंपादक व आवाज महाराष्ट्राचा न्यूजचे कार्यकारी संपादक शैक्षणिक , सामाजिक, पत्रकारीता क्षेत्रातील अष्टपैलू व्यक्तिमत्त्व डॉ जावेद रहेमान शेख यांची सह्याद्री मराठी पत्रकार संघ महाराष्ट्र राज्याच्या प्रदेशाध्यक्षपदी तर श्री शहाजी भोसले यांची प्रदेश कार्याध्यक्षपदी सह्याद्री मराठी पत्रकार संघाचे संस्थापक गोविंद शिनगारे यांच्या हस्ते सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत अंबाजोगाई येथे पत्रकार दिनाचे औचित्य साधून नियुक्ती पत्र देऊन निवड करण्यात आली असून यावेळी प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर डॉ जावेद शेख यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की महाराष्ट्र राज्यातील दैनिक , साप्ताहिक डिजिटल मिडिया पोर्टल , या माध्यमात कार्यरत पत्रकार , संपादक , डिजिटल मिडिया पत्रकार यांच्या वैचारिक विचारांची देवाणघेवाण तसेच पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी व भविष्यातील सामाजिक उपक्रम , राज्याच्या समृद्ध विचारधारेला साजेसे काम करण्यासाठी आम्ही काम करणार असुन येत्या वर्षभरात राज्याभरात सदस्य नोंदणी अभियान सुरू करुन राज्याच्या सर्व जिल्ह्यात जिल्हा पदाधिकारी व राज्याची कार्यकारिणी निश्चित करण्यात येणार असल्याचे निवडी प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले .
सदरील निवडीचा प्रस्ताव संघाचे पदाधिकारी दत्तात्रय भाकरे यांनी मांडला व सुचक म्हणून काशीनाथ कातमांडे यांनी सुचना करुन प्रदेशाध्यक्ष व कार्याध्यक्ष पदाचा ठरावा सर्व पदाधिकारी सदस्य यांनी एक मताने पास करत संस्थापक अध्यक्ष गोविंद शिनगारे यांना निवडीची घोषणा करण्यास सांगितले व पुढील यशस्वी वाटचालीस सर्वांनी शुभेच्छा दिल्या
सदरील कार्यक्रम अंबाजोगाई येथे शासकीय विश्रामगृहात संघाचे पदाधिकारी अनिल ठोंबरे , गोविंद लांडगे , प्रा.दत्तात्रय जाधव , काशीनाथ कातमांडे , डॉ लतिफ शेख , दत्तात्रय भाकरे, बळीराम लोकरे , मनोराम पवार , महादेव दौंड , शिवाजी औसेकर यांच्या उपस्थितीत यशस्वीपणे पार पडला ..