सावळेश्वर येथे मा.अंकुश करपे यांच्या वाढदिवसानिमित्त केशर आंब्याच्या दीड हजार रोपांंचे वाटप
पुढच्या पिढीचा श्वास टिकवण्यासाठी वृक्षसंवर्धनाची गरज----अनिकेत लोहिया

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज विशेष
केज दि १२(प्रतिनिधी)
तालुक्यातील सावळेश्वर येथे ग्रामपंचायत व पानी फाउंडेशन टीम यांच्या वतीने अंकुश करपे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गावकऱ्यांना दीड हजार केशर आंब्याची रोपे मोफत वाटप करण्यात आली.
निसर्गातील सर्व घटकांचे संवर्धन करणे हे आपल्या सर्वांचे जबाबदारी आहे. केशर आंब्याच्या लागवडीने गावात फळांची कमतरता जाणार नाही. गावच्या समृद्धीसाठी सर्वांनी एकत्रित येऊन झोकून द्यावे असे मत अनिकेत भैया यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच मारुती कांबळे प्रमुख मार्गदर्शक मानवलोकचे कार्यवाह अनिकेत भैय्या लोहिया,पानी फाउंडेशनचे मराठवाडा समन्वयक संतोष शिनगारे,पर्यावरण मित्र डॉ हनुमंत सौदागर,पत्रकार संतोष सोनवणे,मनोराम पवार ,प्रमुख उपस्थिती युसूफवडगाव पोलीस स्टेशन चे सपोनि योगेश उबाळे,ग्रामसेवक नितीन सुरवसे ,कृषी सहाय्यक एस एस माचवे, पानी फाउंडेशन चे विनोद ठोंबरे,
उपसरपंच अंकुश करपे ,
सेवा सहकारी सोसायटी चे चेअरमन बापूराव पवार,जलदुत अनील करपे ,ग्रामपंचायत सदस्य अशोक मस्के,माजी सरपंच,माजी उपसरपंच आदी उपस्थित होते.
उपस्थ्यांच्या हस्ते नागरिकांना आंब्याची रोपे भेट देण्यात आली.
संतोष शिनगारे यांनी वृक्ष संगोपन करणे किती महत्त्वाचे आहे याविषयी मार्गदर्शन केले.डॉ हनुमंत सौदागर म्हणाले संतांचा विचार वृक्ष संवर्धन करून जोपायला हवा असे मत व्यक्त केले. संतोष सोनवणे यांनी पाण्याचे काम करणारा माणूस कोरडा राहू शकत नाही हा विचार मांडला.
मनोराम पवार यांनी वृक्ष संवर्धन चळवळीचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.
या वेळी महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती .
,कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डाॅ शिवाजी मस्के यांनी केले तर आभार पवार यांनी केले.