राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिव्यांग सेलच्या केज तालुका अध्यक्षपदी लक्ष्मण काळे यांची निवड
बीड जिल्हाध्यक्ष दिव्यांग सेल श्री हनुमंत घाडगे यांच्या हस्ते दिले नियुक्तीपत्र

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज/ राजकीय
केज तालुका प्रतिनिधी
केज विशेष दि.2/8/2024 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट प्रदेशाध्यक्ष मा.जयंत पाटील , यांच्या मान्यतेने व केज विधानसभा अध्यक्ष सुरेश तात्या पाटील , केज विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व मा.आ. पृथ्वीराज साठे यांच्या मार्गदर्शनाखाली व यांच्या उपस्थितीत तसेच दिव्यांग सेलचे बीड जिल्हाध्यक्ष मा . हनुमंत घाडगे यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या दिव्यांग सेलच्या केज तालुका अध्यक्षपदी श्री लक्ष्मण काळे मौजे सारणी (आ) यांची निवड करण्यात आली असून आदरणीय खा.श्री शरदचंद्र पवार यांच्या विचारानुसार पुढील काळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या व दिव्यांगांच्या विकासासाठी आपण भरीव कार्य करला व पक्ष संघटना मजबूतीने उभी कराला हि अपेक्षा निवडी प्रसंगी करण्यात आली असून सदरील निवडीचे नियुक्ती पत्र देऊन नवनिर्वाचित तालुका अध्यक्ष श्री लक्ष्मण काळे यांना उपस्थितांनी पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या .