गांधी महाविद्यालयात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अंतर्गत विविध शिक्षणक्रमास मान्यता – प्रवेश सुरू

केज। प्रतिनिधी
आपल्या विकसनशिल भारत देशात चौफेर क्षेत्रात विकासात्मक धोरणाच्या जोरावर, जागतिक महासत्तेकडे यशस्वी वाटचाल करत असताना भारतीय शैक्षणिक धोरण अधिक भक्कम करण्यात मुक्त विद्यापीठाचे अतिशय महत्त्वाचे योगदान दिले आहे. १ जुलै १९८९ रोजी स्थापना झालेले यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ हे देशातील महत्वाचे मुक्त विद्यापीठ असुन शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या विद्यार्थ्यांना या विद्यापीठाने शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिलेली आहे. विद्यापीठ हे शिक्षणक्रमाचा दर्जा उच्च राहण्यासाठी शिक्षणक्रम विकासापासून विद्यार्थ्याच्या मुल्य मापणापर्यंत प्रत्येक टप्प्यावर काळजी घेते.रोजगार, व्यवसायाच्या विविध संधी प्राप्त होण्याकरिता आवश्यक असणारी कौशल्ये संपादित करता यावी या हेतुने विद्यापीठाने महत्वाच्या सर्व शिक्षणक्रमांची रचना केली आहे.
विद्यापीठाचे शैक्षणिक उद्दिष्टे पुर्ण करण्यात कार्यक्षम असलेल्या महाविद्यालयांना हे मुक्त विद्यापीठ महत्वाच्या शिक्षणक्रमासाठी मान्यता देते.
श्री अमोलक जैन विद्या प्रसारक मंडळाचे गांधी महाविद्यालय कडा, ता.आष्टी, जि.बीड येथे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे विविध शिक्षणक्रम सुरु झाले आहेत. संस्थेचे पदाधिकारी यांचा शिक्षणाविषयी सकारात्मक दृष्टीकोन असल्यामुळे विद्यापीठाने नवीन शिक्षणक्रमास मान्यता दिली आहे. महाविद्यालयाचा अभ्यासकेंद्र संकेतांक हा २२१५५ आहे.यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने गांधी महाविद्यालय अंतर्गत पदवी अभ्यासक्रमामध्ये बी.ए., बी.कॉम., बी.ए.पत्रकारिता, बी.लिब., बी.सी.ए. तर पदवीत्तर विभागामध्ये एम.ए. मराठी,एम.ए. इंग्रजी,एम.ए. अर्थशास्र,एम.ए. लोकप्रशासन, एम.कॉम., एम.लिब., एम.बी.ए., एम.एस्सी. गणित, एम.एस्सी रसायनशास्त्र आणि एम.एस्सी वनस्पतीशास्त्र इत्यादी, शिक्षणक्रमाचे प्रवेश सुरु आहेत, महाविद्यालयमध्ये सदर शिक्षणक्रमासाठी सुसज्ज ग्रंथालय, सुविधायुक्त प्रयोगशाळा, सुसज्ज इमारत, तज्ञ प्राध्यापक व बहिस्थ अधिव्याख्याते आणि भौतिक सेवा सुविधा उपलब्ध आहेत. प्रत्येक शिक्षणक्रमाच्या जागा मर्यादित आहेत, तरी आपला प्रवेश लवकर निश्चित करावा असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.नंदकुमार राठी, उपप्राचार्य डॉ.जवाहरलाल भंडारी आणि केंद्रसंयोजक डॉ.अशोक कोरडे यांनी केले आहे, प्रवेश प्रक्रियेसाठी केंद्रसंयोजक डॉ.अशोक कोरडे (९४२३७५६३६८), तंत्रसहाय्यक श्री.ज्ञानेश्वर खंदारे (९०४९२५७३९२), श्री.महेंद्र पेटकर (९४०४३०००७४), श्री.संतोष गोडसे (९७३०२०४६४२) यांच्याशी संपर्क साधावा.