विद्याभवन हायस्कूल कळंबच्या विद्यार्थ्यांचे पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये घवघवीत यश

(कळंब प्रतिनिधी) ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळा संचलित विद्याभवन हायस्कूल कळंब प्रशालेतील विद्यार्थ्यांनी सन २०२१-२०२२ स्कॉलरशिप मध्ये परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. इयत्ता पाचवी वर्गामधून प्रशालेतून एकूण 22 विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये पात्र ठरले. आठवीच्या वर्गामधून एकूण अकरा विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरले आहेत. सदरील विद्यार्थ्यांची नावे पुढील प्रमाणे, इयत्ता पाचवी मधून उदय काळे, अनिशा नांदे, अर्णव भोसले, मृणाल पवळ, रुद्र देशमुख, तन्मय शिंदे, पुष्कर चौधरी, वैष्णवी सूर्यवंशी, वरद तांबारे, युवराज मुंडे, शंभूराजे निकम, वैभव भाग्यवंत, मंथन अडसूळ, श्रावणी गोसावी, जोया शेख, शर्वरी गुरव, कृष्णा गिड्डे, सृष्टी जाधव, समर अडसूळ, रिया आडणे, आयुष गव्हाणे, हुरेन शेख आदी विद्यार्थ्यांचा समावेश आहे. इयत्ता आठवी मधून पात्र ठरलेले विद्यार्थी सुखदा गौंड, शिवम चोंदे, दिग्विजय गिरी, हर्ष बनसोडे, संस्कृती शेवाळे, सत्यजित शेळके, श्रेयश शिंदे, अल्सवा रामपुरे, प्राजक्ता काळे, शिवकुमार सुकाळे, श्रेया शिंदे, आदी विद्यार्थ्यांचा समावेश आहे. सदरील विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळाचे सचिव डॉ. अशोकराव मोहेकर, संस्थेचे अध्यक्ष प्रा.आबासाहेब बारकुल, प्रशालेचे मुख्याध्यापक पवार व्ही.एस, उपमुख्याध्यापिका श्रीमती पाटील एस.डी, पर्यवेक्षक खामकर दिगांबर आदींसह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंदा यांच्याकडून होत आहे. तसेच पालक वर्गातूनही यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे.