तब्बल 40 वर्षानंतर 1982 च्या बी. एड्. बॅचचा पहिला स्नेह मेळावा संपन्न.

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज / शैक्षणिक
अंबाजोगाई/प्रतिनिधी
अंबाजोगाई येथे 1982 साली बी. एड्. करणारऱ्या छात्राध्यापकांनी तब्बल 40 वर्षांनंतर अतिशय आत्मियतेने एकत्र येऊन आपला पहिला स्नेह मेळावा पार पाडला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शासकीय अध्यापक महाविद्यालय अंबाजोगाई च्या प्राचार्य मा. डॉ. बेलेकर् मॅडम यांनी भूषविले. सर्वप्रथम दिवंगत बंधू-भगिनी तसेच दिवंगत गुरुवर्य यांना दोन मिनिटे स्तब्धता राखून आदरांजली वाहण्यात आली. त्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली. प्रत्येकाने येऊन आपापले मनोगत व्यक्त करावे. मनोगत व्यक्त करणाराने आपल्या नंतर येणाऱ्याचे स्वागत/ अभिनंदन करावे अशी या कार्यक्रम पत्रिकेची खासीयत होती. याने उपस्थित छात्राध्यापक खूपच प्रभावीत झाले. हा मेळावा आयोजित करण्यासाठी 63 बंधू भगिनींना संपर्क करण्यात आला. यामध्ये आमच्या भगिनी विमल कन्नडकर, छाया पाटील, डाॅ. विजया केदार यांनी खूप कष्ट घेतले. दरम्यान आमचे गुरुवर्य आदरणीय कानोले सरांचा सत्कार त्यांच्या निवासस्थानी नांदेड येथे करण्याचे भाग्य आम्हाला लाभले. मेळव्यामध्ये 42 जण उपस्थित होते. पैकी 12 जण सपत्निक सहभागी झाले होते. आज वर्तमान काळात कोणीही कार्यरत नाही सर्व जण सेवानिवृत्त झालेले आहेत. प्रत्येकाने दिलखुलासपणे आपापले मनोगत व्यक्त केले. आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. यासाठी मेनकुदळे शिवराज, कुलकर्णी गुंडेराव, चाटे मोहन, सुरेश जाधव, सतीश पत्की, शिवशंकर थळकरी हौसराव पवार, श्रीराम जाधव, प्रकाश निला, दिनकर शेळके, सोमीनाथ मोराळे, मुकुंद गोरे, प्रेमकुमार पितांबरे यांनी खूप परिश्रम घेतले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेख दस्तगीर अब्दुल सरांनी केले तरआभार प्रदर्शन सर्वांनी आपापल्या मनोगतातच व्यक्त केले.कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली. त्यानंतर भोजनालयात जाऊन सहभोजनाचा आस्वाद घेतला आणि सर्वांनी जड अंत:करणाने एकमेकांचा निरोप घेतला.