पैठण येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त शिवजन्मोत्सव समिती यांच्यातर्फे महाआरोग्य शिबिराचे आयोजन
पैठणचे भूमिपुत्र डॉक्टर श्री कैलास पैठणकर सर बीड यांच्या उपस्थितीमध्ये आयोजित केले होते

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज विशेष
केज :प्रतिनिधी
: केज तालुक्यातील पैठण येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त दि २२रोजी सकाळी अकरा वाजता महाआरोग्य शिबिराचे आयोजन,शिबिरात घेतला पाचसेच्या वर रूग्णांनी लाभ ,
प्रती वर्षा प्रमाणे या हि वर्षी छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त विविध सामाजिक उपक्रम छत्रपती शिवाजी महाराज जयंती समिती कडुन आयोजित केले जातात,याहि वर्षी रक्तदान शिबीर, आरोग्य तपासणी शिबिर, गुणवंतांचा गुण गौरव सोहळा, वक्तृत्व स्पर्धा,अशा विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन केले आहे,या पैकी आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले यात पाचशेच्या वर रूग्णांनी याचा लाभ घेतला तर यात दोन लाख रु किंमतीची औषधे रुग्णांना मोफत वाटण्यात आली,या शिबिरात डोळे तपासणी,पोटाचे आजार तपासणी,स्त्रीयांचे आजार तपासणी, तसेच मानसोपचार तज्ज्ञ यांनी देखील झोप न येणे स्वप्नं पडने आदी रुग्णांना मोफत तपासले,व यातील सहभागी रुग्णांना उपलब्ध दोन लाख रुपये किंमतीची औषधे मोफत वाटण्यात आली,
या शिबिराचा लाभ गावातील महिलांना , जेष्ठ नागरिक,अबाल वृद्ध यांनी मोठ्या प्रमाणात घेतला ,या वेळी
डॉ.चंद्रकांत गायकवाड पोट विकार तज्ञ,डॉ.खिराजी पाखरे नेत्रतज्ज्ञ ,डॉ.सुदाम मोगले मानसोपचार तज्ञ,डॉ.कैलास पैठणकर पोट विकार तज्ञ ,डॉ.अनिमेश पैठणकर,एम.बी.बी.एस.श्री.सुरज जाधव औषधनिर्माता,
श्री.अतुल दाभाडे ब्रदर ,डॉ शिवाजी मस्के ,डॉ उपेंद्र कुलकर्णी
स्त्रीरोग तज्ज्ञ यांनी रुग्णांना मोफत वैद्यकीय उपचार केले .
चौकट:-माझ्या जन्म भुमीतील, गावातील गोरगरीब रुग्णांना पोटाचे विकार असतील अशा सर्व रुग्णांना मोफत उपचार व शस्त्रक्रिया केल्या जातील,अशा रुग्णांनी संपर्क साधावा……. डॉ कैलास पैठणकर पोटविकार तज्ञ