शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार अनुदान द्या -शिवाजी ठोंबरे
कापसाच्या झाल्या वाती सोयाबीन ची झाली माती

कृषी विशेष
बीड/प्रतिनिधी
बीड जिल्ह्यात परतीच्या पावसाने पुन्हा कहर करत शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरऊन घेतला आहे,आईन दिवाळीत सणासुदीच्या तोंडावर दुःखाचे सावट पसरले आहे दिवाळीला आलेल्या मुलं बाळ यांना साडी चोळी घेण्यासाठी सुद्धा पैसे नाहीत असा प्रश्न बळीराजाच्या समोर उभा आहे शेतकऱ्याच्या या बिकट अवस्थेत राज्य शासनाने शेतकऱ्यांना आधार देण्याची गरज आहे अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना सरसकट कुठलाही निकष न लावता हेक्टरी ५०हजार रुपयाची मदत द्यावी असे छावा चे शिवाजी दादा ठोंबरे यांनी केली आहे जिल्ह्यात सर्वच मंडळात अतोनात नुकसान झाले आहे,
परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान केलेले आहे शेतकऱ्यांच्या शेतात तळे सासून,पाणी सासून अक्षरःश
कापसाच्या वाती झालेल्या आहेत व हाताशी आलेल्या सोयाबीन ची झाली माती झालेली आहे, त्याच बरोबर फळ पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे सोयाबीन तर शेतकऱ्यांच्या घरी येणारच होती परंतु शेतात पाणी साचल्यामुळे पिकाचे फार नुकसान झाले हाता तोंडाशी आलेला घास गेला शेतकरी आत्महत्या करत आहेत शासनाने या गोष्टीचा विचार करून शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्यावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडू असा इशारा छावा चे शिवाजी दादा ठोंबरे यांनी दिला आहे.
————–
परतीच्या पावसाने शेतकरी मोठा हतबल झाला आहे, हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे,अतापर्यंत तळ हातातल्या फोडा प्रमाणे जपलेले शेतातील कापूस, सोयाबीन मध्ये तळे साचले आहे, पीक पूर्ण हातचे गेले आहे,कर्जाचा डोंगर डोक्यावर आहे झालेल्या नुकसानी मूळे कर्ज कसे फेडणार त्यासाठी शासनाने शेतकऱ्यांना सरसगट अनुदान द्यायला पाहिजे.
-प्रशांत ठोंबरे (शेतकरी)