आपला जिल्हा

पावसाअभावी संकटात सापडलेल्या बळीराजाला तत्काळ मदत करा.. डॉ उत्तम खोडसे – शिवसंग्राम

पावसाने उघडीप दिल्याने हाताशी आलेली पिके करपु लागली. .

पावसाअभावी संकटात सापडलेल्या बळीराजाला तत्काळ मदत करा- डॉ उत्तम खोडसे-शिवसंग्राम

——————————

पावसाने उघडीप दिल्याने हाताशी आलेली पिके लागली करपु .

_______________________

केज प्रतिनिधी

शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष मा. आमदार स्व. विनायकरावजी मेटे साहेब यांनी कायम शेतकरी ,शेतमजूर , कष्टकरी यांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी संघर्ष केला व अनेक प्रश्न मार्गीही लावलेले आहेत शेतकरी जगला पाहिजे शासनाने शेतकरी हिताचे निर्णय तत्काळ घ्यावेत यासाठी अनेक वेळा सभागृहात एकाकी खिंड लढवत सभागृहात शेतकरी कष्टकरी कामगार यांच्यासाठी लढणारे लोकनेते म्हणुन स्व.आमदार विनायकरावजी मेटे साहेब यांची आठवण शेतकरी कष्टकरी कामगार हे सातत्याने काढताना दिसतात लोकनेते आ. विनायकरावजी मेटे यांच्या विचारांचा व कार्याचा वारसा हातात घेऊन महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मा.आ.स्व . विनायकरावजी मेटे साहेबांचे अनेक कार्यकर्ते सर्वसामान्यांच्या प्रश्नावर लढत आहेत यापैकीच एक आसणारे निकटवर्तीय व विश्वासु कार्यकर्ते म्हणुन सर्वांना परिचित असलेले नेतृत्व डॉ उत्तम खोडसे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर रणशिंग फुंकले असुन आज घडीला शेतकरी बांधव पावसाअभावी हावलदील झाला असुन अनेक संकटांवर मात करून शेतात राब राब राबून , आर्थिक परिस्थितीशी कसेबसे जुळून घेत पिकांची पेरणी केली आणि पिकेही जोमदार आली परंतु मागील अनेक दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने हाता तोंडाशी आलेली पिके करपून जात आहेत व बहुतांश ठिकाणी तर पिके करपून गेली आहेत आशा या परिस्थितीत जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांना, बळीराजाला भरीव तरतूद करुन शासनाने शंभर टक्के मदत केली पाहिजे अशी मागणी शिवसंग्रामचे नेते डॉ उत्तम खोडसे यांनी माध्यमांशी सवांद साधतान सांगितले असुन शासनाने कसल्याही प्रकारची दिरंगाई न करता शेतकऱ्यांना संकटातुन बाहेर काढण्यासाठी …
1) तत्काळ आर्थिक मदत केली तर बळीराजाला आधार होईल .2) पिकांच्या नुकसानभरपाई पोटी वेगळी आर्थिक तरतूद करण्यात यावी .3) जनावरांना चारा उपलब्ध करण्यासाठी अनुदान देण्यात यावे .4) शेतकरी शेतमजूरांच्या मुला मुलींना सरसगट शिक्षणासाठी केजी टु पीजी आर्थिक मदत करावी .

या सर्व मागण्याचा विचार शासनाने तत्काळ करावा व सर्व बाजूंनी संकटात सापडलेल्या बळीराजाला मदतीचा हात देऊन सुरू आसलेली फरफट थांबवावी अशी मागणी शिवसंग्रामचे नेते डॉ उत्तम खोडसे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर व्यक्त होताना सांगितले आहे .

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.