अनिल वैरागे यांना संगीत क्षेत्रातील कला गौरव पुरस्कार प्रदान

केज (प्रतिनिधी)
दि. १२/१०/2०22 रोजी संगीत क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल सूर ताल संगीत विद्यालयाच्या वतीने दरवर्षी दिल्या जाणारा संगीत कला गौरव पुरस्कार यावर्षी केज येथील गायक ,वादळ ,अनिल वैरागे यांना देण्यात आला सदरील पुरस्कार वितरण सोहळा संगीत क्षेत्रातील बाबुरावजी बाबुळगावकर, मा .श्री .राहुल देशपांडे श्री सत्यवान नारायणराव शिंदे .मा .श्री .दत्ता वालेकर सर ,मा .श्री .नागनाथ जी बडे सर ,मा .श्री.श्रीनिवास नवगिरे सर ,सिंगर गायकवाड बंधू धारुर, पद्माकरजी सेलमुख सर, तसेच अनंत राजनकर, सौ शोभा बाबळगावकर, सौ भाग्यश्री गायकवाड, सौ सारिका सरवदे, असे अनेक मान्यवर उपस्थित होते या मान्यवरांच्या हस्ते सुर – ताल संगीत विद्यालयाच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून हा पुरस्कार देण्यात आला या पुरस्काराचे स्वरूप सन्मान चिन्ह व सन्मानपत्र आसे होते पुरस्कार वितरण सोहळ्याच्या कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक क्षेत्रातील माहेरघर असणाऱ्या दासोपंत संशोधन केंद्र देशपांडे गल्ली अंबाजोगाई येथे करण्यात आले यावेळी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करताना अनिल वैरागे यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. व या कार्यक्रमाचे सांगता सुरताल संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी गायन व वादन करून केली तर प्रस्तावना राहुलजी देशपांडे यांनी केली व आभार प्रदर्शन हे मा .श्री.बाबुरावजी बाबळगावकर सर यांनी केले.