काळेगाव माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्राचार्यपदी श्री.राहूल गदळे यांची निवड
निवडीबद्दल शैक्षणिक सामाजिक सह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी दिल्या भरभरून शुभेच्छा..

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज विशेष
कज /प्रतिनिधी
काळेगाव घाट येथील काळेगाव माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्राचार्य पदी राहुल भैय्या गदळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी शिवकृपा विद्या प्रसारक मंडळ दहिफळ (वडमाऊली ) शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री सखाहरी तात्या गदळे यांनी राहुल भैय्या गदळे यांची काळेगाव माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्राचार्य पदी सर्वानुमते निवड केली. तरुण, तडफदार ,अत्यंत हुशार व्यक्तिमत्व असणारे राहुल भैय्या गदळे यांची प्राचार्य पदी निवड केल्यामुळे काळेगाव माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राध्यापक,शिक्षक, शिक्षकेत्तर ,विद्यार्थी व विद्यार्थिनींनी राहुल भैय्या गदळे यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
प्राचार्य पदी निवड केल्यामुळे परिसरातील मित्र, पालकांनीय्यां शाळेत येऊन सत्कार केला व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
राहुल भैया गदळे यांनी प्राचार्य पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर आपल्या शाळेमध्ये विविध उपक्रम घेऊन विद्यार्थ्यांचा सर्वांगीण कसा होईल याकडे लक्ष दिले जाईल व आपल्या काळेगाव माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी देशातच नव्हे तर जगामध्ये आपल्या शाळेचे नाव कसे उज्वल करू शकतो याकडे लक्ष दिले पाहिजे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हाच महत्त्वाचा असतो. विद्यार्थ्यांनी मधील कलागुणांना वाव देऊन त्यांच्यातील सुप्त गुण बाहेर काढून ते त्याच्या पुढील आयुष्यासाठी कसे उपयोगी पडेल याकडे प्रकर्षाने लक्ष दिले जाईल. यापुढे आपण सर्वांनी एकजुटीने अध्यापन कार्य करून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करावयाचा आहे. इयत्ता दहावी च्या विद्यार्थ्याकडे जास्तीत जास्त लक्ष देऊन त्यांना येणाऱ्या परीक्षा साठी अभ्यासक्रम पूर्ण करून त्यांच्याकडून जास्त तासिका घेऊन सराव करून घ्यावा असे सर्व शिक्षकांना सूचना केल्या. या मिटिंगचे प्रस्ताविक श्री.गायकवाड बी.एम. यांनी केले व अनुमोदन श्री ढाकणे सर यांनी दिले. यावेळी शाळेतील शिक्षक, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.