केज येथे विजय स्पोर्ट्स क्रीडा अकॅडमीचे वतीने उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन
खेळाडूंनी प्रशिक्षणात सहभागी व्हावे - प्रा.विनोद गुंड

केज तालुका प्रतिनिधी
केज शहर व तालुक्यातील खेळाडूंसाठी विजय स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने विविध खेळांच्या उन्हाळी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती अकॅडमीचे संचालक विनोद गुंड यांनी दिली आहे.
विजय स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने १ मे ते १ जून दरम्यान एक महिन्याचे फुटबॉल, व्हॉलीबॉल, क्रिकेट, योगा, बुद्धीबळ, तायक्वांदो खेळाचे उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण आयोजन केले आहे. या शिबिरामध्ये शास्त्रशुध्द पध्दतीने क्रीडा प्रशिक्षण दिले जाणार असून या शिबिरात १४ वर्षाखालील मुला – मुलींना प्रवेश दिला जाणार आहे. हे शिबिर स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूलच्या स्कूलच्या मैदानावर सकाळी ६ ते ८ या वेळेत होणार आहे. या शिबिरात केज तालुक्यातील खेळाडूनी सहभाग व्हावे. असे आवाहन विजय स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने क्रीडा संयोजक विनोद गुंड यांनी केले आहे.