184 वर्षाची परंपरा असलेल्य्या श्रीराम नवमी जन्मोत्सवाचा सोहळा मौजे आवसगाव नगरीत थाटात साजरा
महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील तसेच पंचक्रोशीतील हजारो श्री रामभक्तांची आवसगाव नगरीत जमली मांदियाळी

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज / विशेष प्रतिनिधी
श्रीराम नवमी विशेष
वारसा विचारांचा, वारसा सांस्कृतिचा..!!!
मौजे आवसगावची श्रीराम नवमी उत्साहात साजरी , पंचक्रोशीतील हजारो रामभक्तांची जमली मांदियाळी.श्रीरामाच्या पालखीने वेधले सर्वांचे लक्ष
श्रीराम नवमी उत्सवात चिंच ,गुळाचे पन्न व पुरीच्या महाप्रसादाचा हजारों रामभक्तांनी घेतला लाभ ..
बीड जिल्हा प्रतिनिधी
केज तालुक्यातील मौजे आवसगाव येथे प्रतिवर्षाप्रमाणे 184 वर्षांपासून अविरत सुरू असलेली श्रीराम नवमीची पंरपरा आजही सुरू आसुन श्रीराम नवमी जन्मोत्सव सोहळा -2024 निमित्त श्रीरामाच्या मंदिरात प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी अंखड हरिनाम सप्ताहाचे आयोजन मौजे आवसगाव येथील ग्रामस्थांच्या यशस्वी नियोजनातुन करण्यात आले यात महाराष्ट्रातील ख्यातनाम किर्तनकार यांच्या अमृततुल्य वाणीतुन सातही दिवश किर्तन सेवा संपन्न झाली यात दैनंदिन काकड आरती , हरिपाठ , ज्ञानेश्वरी पारायण , भजन व संध्याकाळी किर्तन व किर्तन सेवेनंतर विविध पंचक्रोशीतील भजनी मंडळ यांचे मंत्रमुग्ध करणारा हरीजागर नित्य संपन्न होत असे व आज श्रीराम नवमी जन्मोत्सवानिम्मित महाराष्ट्रासह देशभरात प्रसिद्ध असणारे ह.भ.प रामेश्वर महाराज शास्त्री (जुन्नर) यांचे अमृततुल्य अशी किर्तन सेवा संपन्न झाली यावेळी मंदिर परिसरात हजारोंच्या संख्येने महिला, पुरुष लहान थोर रामभक्तांची मांदियाळी बघायला मिळाली किर्तन सेवे प्रसंगी आवसगाव नगरी हि अयोध्या नगरी सारखी नटल्याचे व शुभिवंत दिसत असल्याचे सांगितले आपल्या आवसगावचे आपण सर्व भुमिपुत्रांनी आजही आपल्या पुर्वजानी सुरू केलेली पंरपरा सुरू ठेवली याचे खुप कौतुक आहे आपल्या सर्वांवर श्रीरामचा आशीर्वाद आहे यामुळे आपल्या गावाला विकासाची गंगा व भरभराटीचे दिवस कायम चांगले आहेत आपण सर्व आवसगाव गावकरी अथक परिश्रम श्रीराम नवमीत घेता यासाठी आपल्या सर्वांचे भरभरून कौतुक करावे तेवढे थोडेच असल्याचे गौरवोद्गार ह.भ.प रामेश्वर महाराज शास्त्री यांनी व्यक्त केले ठिक दुपारी 12 वाजता श्रीराम जन्माची फुले उधळण करत एकच जयघोष करत राम जन्म झाला यानंतर श्रीरामाचे नामकरण करण्यात येऊन श्री रामाच्या जन्माचा पाळणा राममंदिरात सर्वांनी म्हणत आगळावेगळा आनंदोत्सव साजरा करत श्रीराम नवमी साजरी केली व उपस्थितांनी एकमेकांना रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या तसेच पुर्वीपासून परंपरागत असलेल्या पन्न व पुरी चा लाभ घेत महाप्रसाद घेतला यावेळी गावातील युवक मित्र मंडळ यांचे विशेष सहकार्य लाभले .
श्रीराम नवमी निमित्त गावात यात्रेचे भव्य दिव्य स्वरूप ..
श्रीराम नवमी जन्मोत्सव सोहळा -2024 मध्ये प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी विविध यात्रेतील लहान मुलांचे खेळ खेळण्यासाठी विविध आनंददायी प्रकार सामिल झाले होते यात खाऊचे दुकाने , खेळण्यांची दुकाने , भुईवाले , रहाटपाळणे , खाऊ गल्ली , पान फुल , पेढ्यांची प्रसादाची दुकाने सह भव्य दिव्य आवसगाव नगरीत आलेल्या सर्व श्रीराम भक्तांचे हार्दिक स्वागत करत असलेली स्वागत कमान व गावातील विविध युवा ग्रुपच्या माध्यमातून हार्दिक अभिनंदन करण्यात आले .व श्रीराम नवमी जन्मोत्सव सोहळा -2024 उत्साहात साजरा करण्यासाठी गावातील सर्व समाज बांधवांनी अथक परिश्रम घेतले असुन नाविन्यपूर्ण अशी श्रीराम नवमी साजरी केली आहे .. व आज ह.भ.प बादाडे महाराज यांचे श्रीराम नवमी निमित्त काल्याचे किर्तन संपन्न होऊन यावर्षीच्या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता झाली यावेळी सर्व भाविक भक्तांनी गोपाळ कालयाचा आनंद घेतला प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी श्रीराम नवमी जन्मोत्सव सोहळा समिती मौजे आवसगावच्या वतीने यशस्वी चोख नियोजन करण्यात आले होते.