युवा नेते किरण शिनगीरे यांचा वाढदिवस नवजीवन संगोपन केंद्र येथे साजरा
सामाजिक कार्याने वाढदिवस साजरा

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज विशेष
आष्टी तालुका प्रतिनिधी
सामाजिक बातमीपत्र
*आष्टी तालुक्यात नवजीवन फाउंडेशन संचलित नवजीवन संगोपन केंद्र येथे अनाथ,निराधार,ऊसतोड मजूर,वीटभट्टी कामगार,आदिवासी,भटके विमुक्त,गरीब,वंचित,दुर्लक्षित घटकातील मुलांचा मोफत सांभाळ करून शिक्षण दिले जाते.*
*या नवजीवन संगोपन केंद्रास शासनाचे कोणत्याही प्रकारचे अनुदान किंवा मदत मिळत नाही सदरील केंद्र समाजातील दानशूर व्यक्तींच्या सहकार्यातून आणि मदतीतून चालवले जात आहे.*
*या अनाथ,निराधार मुलांना फुल ना फुलाची पाकळी मदत व्हावी.तसेच आपणही समाजाचे काही देणे लागतो या उदात्त भावनेने आष्टी तालुक्यातील वटनवाडी येथील युवा नेते नेहमीच सामजिक कार्यास हातभार लावणारे किरण दादा शिनगीरे यांनी अनावश्यक खर्च टाळून नवजीवन संगोपन केंद्र येथील गोरगरीब,अनाथ निराधार मुलांना शालेय साहित्य,खेळाचे साहित्य आणि खाऊ देऊन सामाजिक उपक्रमाने आपला वाढदिवस साजरा केला.*
*या कार्यक्रमास युवा नेते किरण दादा शिनगीरे,संभाजी ब्रिगेड प्रदेश संघटक शशिकांत कन्हेरे सर,बळीराम शिनगीरे,आण्णा नरवडे,कार्तिक भोसले,अजय शिनगिरे उपस्थित होते.*
*कार्यक्रमाच्या शेवटी नवजीवन संगोपन केंद्र संस्थापक अध्यक्ष विकास म्हस्के मेजर यांनी सर्वांचे मनापासून आभार मानले.*