जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत द्या:- शिवाजी दादा ठोंबरे
कृषी विशेष

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज
केज :- प्रतिनिधी
बीड जिल्ह्यात मागील आठवड्यात अवकाळी पाऊस व गारपीट मोठ्या प्रमाणात झाल्याने शेतीपिकासह इतरही नुकसान मोठ्या प्रमाणात झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.शेतीपिकांबरोबर अनेक ठिकाणी पशुधन ही दगावल्याची घटना घडली आहे.प्रशासनाचे याचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये नुकसाभरपाई देण्याची मागणी छावा मराठा संघटनेचे जिल्हाप्रमुख शिवाजी दादा ठोंबरे यांनी निवेदाद्वारे केली आहे.
सध्या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी वर्ग संकटात सापडला आहे.नुकसान ग्रस्तांना तात्काळ मदत मिळणे गरजेचे आहे म्हणून प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन तात्काळ मदत मिळवून देण्याची कार्यवाही करण्याची मागणी निवेदाद्वारे केली आहे.
यावेळी छावा मराठा संघटनेचे जिल्हाप्रमुख शिवाजी दादा ठोंबरे,ओमप्रकाश करपे,गणेश गुजर,उत्रेश्वर थोरात,अंगद राऊत यांच्यासह इतर उपस्थित होते.