देवळा येथे संत तुकोबाराय बीजेनम्मित भव्य युवा कर्तन महोत्सवाचे आयोजन .
नागरीकांनी उपस्थिती राहाण्याचे आयोजकांच्या वतीने आवाहन

अंबाजोगाई ता. प्रतिनिधी
प्रा. दत्तात्रय जाधव
अंबाजोगाई तालुक्यातील मौजे देवळा प्रती वर्षा प्रमाणे याही वर्षी श्री संत तुकाराम महाराज बीज युवा किर्तन महोत्सव सोहळा देवळा वर्ष 7 वे सर्वांच्या सहकार्य आणि लोकसभागातुन आयोजन करण्यात आले आहे.. दि.8 मार्च ते 10 मार्च 2023 रोजी महोत्सव सोहळा होणार आहे या मध्ये नामवंत किर्तनकार यांची किर्तनाची सेवा होणार आहे.. महाराष्ट्रातील दिग्गज अशी गायक वादक गुणीजन मंडळी या कार्यक्रमासाठी येणार आहेत.. तसेच धुळवड ही गाव स्वच्छ करून साजरी करून श्री संत तुकाराम महाराज बीज उत्सव सुरू होईल या मध्ये नेत्र तपासणी, आरोग्य शिबीर, रक्तदान,रक्ततपासणी वै ज्ञानिक दृष्टिकोन ठेऊन टाकाऊ वस्तू पासून टिकाऊ वस्तू तयार करणे प्रदर्शन, शेती सल्ला व शेतीचे आरोग्य ,सेंद्रिय शेती ,सांस्कृतिक कार्यक्रम, महिलांसाठी खेळ पैठणीचा, शैक्षणिक, आरोग्यदायी, केवळ आध्यात्मिक कार्यक्रम नाही तर भारतीय संस्कृतीचा ठेवा आणि भारतीय पारंपरिक पद्धतीने माणसातील ओलावा जपणारा कार्यक्रम होणार आहे..या तीन ही दिवस सर्वांसाठी अन्नदान सेवा होणार आहे.. या सर्व कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित रहावे ही विनीती, श्रीसंत तुकाराम महाराज बीज उत्सव समिती देवळा देवळा श्रमकरी ग्रुप ग्रामीण किसान शेतकरी गट देवळा/ सारसा, देवळा गावकरी. यांच्या वतीने आयोजन करण्यात आले असुन पंचक्रोशीतील नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे .