माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीच्या केज तालुका अध्यक्षपदी – महादेव दळवे यांची निवड
निवडीचे सर्व स्तरातून स्वागत ..

समृद्ध महाराष्ट्राच्या सर्वांगीण बातम्यांसाठी वैभवशाली महाराष्ट्र न्यूज. मुख्य.संपादक -: जी.बी शिनगारे
डिजिटल मिडिया निवड विशेष…!
केज ,( प्रतिनिधी):-
केज येथील प्रसिद्ध व्यापारी केज तालुक्यातील सर्व परिचीत असे व्यक्तिमत्व झुंजार पत्रकार संघाचे जेष्ठ पत्रकार महादेव दळवे यांची महिती अधिकार व पत्रकार संरक्षण समिती च्या केज तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे
माहिती अधिकार आणि पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असतांना येणाऱ्या अडीअडचणी सोडवत माहिती अधिकार आणि पत्रकारितेची चळवळ सक्षम आणि सशक्त करण्याच्या हेतूने महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीचे विनोद गायकवाड, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष यांच्या शिफारसीनुसार राष्ट्राची लोकशाही विचारधारा यशस्वी करण्यासाठी माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीची ध्येयधोरणे लोकशाही भारताच्या शाश्वत विकासासाठी राबवण्याची केज तालुक्याची जवाबदारी महादेव दळवे यांना देण्यात आली आहे
गुणवत्ता, संघटनात्मक तसेच लोकाभिमुख कार्य आणि कार्यक्षमता पाहून पुढील मर्यादा व पदांचा विचार केला जाईल. मी कायदे आणि संघटनेने वेळोवेळी घालून दिलेल्या नियमांचे पालन करून भारतीय संविधानाला अभिप्रेत शाश्वत विकासासाठी सामाजिक न्याय व हक्कांसाठी बांधील राहील असे महादेव दळवे यांनी निवडी नंतर बोलतानां सांगितले महादेव दळवे यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे तसेच मित्र मंडळी राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मंडळी यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले