छावा संघटनेकडून देश भक्त सुभेदार भारत सिरसट यांचा सेवानिवृत्त झाले म्हणून मोठा नागरी सत्कार..
प्रत्येक देशभक्तांचा आदर सत्कार करने हे आमच्या संघटनेचे आमचे कर्तव्य......शिवाजीदादा ठोंबरे

वैभवशाली महाराष्ट्र राज्य
केज/प्रतिनिधी
बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यातील गांजपुर येथील सैनिक सेवानिवृत्त झाल्याबद्दल ग्रामस्थांनी मिरवणूक काढून त्यांचा सपत्नीक सत्कार केला.देशसेवा करताना निवृत्त झालेल्या भारत सिरसट सैनिकांची छाती ग्रामस्थांच्या सन्मानाने फुलून आली.भारतीय सैन्य दलात विविध संकटांना सामोरे जात देशाचे रक्षण करणारे जवान भारतमातेचे भूषण असतात.अशा सैनिकांचा ज्या,त्या गावांना अभिमान असतो.गांजपुर (ता. धारूर) येथील एक सैनिक वर्ष २०२२ मध्ये सेवानिवृत्त झाले.त्यांचा सन्मान करण्यासाठी रविवार (ता.२२) स्वागतालाच या जवानांची ग्रामस्थांनी वाजत-गाजत मिरवणूक काढली.गावचे सुपुत्र देशाचे रक्षण करतात याचा अभिमान असल्याने त्यांचा गावातील नव्या उमेदीच्या तरुण पिढीने घ्यावा,या हेतूने निवृत्त सैनिकांची मिरवणूक काढून त्यांचा सन्मान करण्याचे ग्रामस्थांनी ठरविले होते.
त्यासाठी दि.२२/जानेवारी हा दिवस निवडला. गावातील सुभेदार भारत सिरसट हे जवान २८
वर्षे देशसेवा करून निवृत्त झाले.सन १९९४ साली भारतीय सैन्य दलात भरती झालेले भारत सिरसट यांनी हैद्राबाद येथे प्रशिक्षण पुर्ण करून पुढे मेरठ,आसाम,पुणे,नाशिक, जोधपूर,जम्मु काश्मीर,भटींडा,जालंदर,लेह – लद्दाक या ठिकाणी सेवा केली आहे.सुभेदार भारत सिरसट यांचा जम्मु काश्मीर येथील सर्जिकल स्ट्राईक व पुलवामा ईअर स्ट्राईक मध्येही सहभाग होता.वाजत-गाजत मिरवणूक सुभेदार भारत सिरसट यांची मिरवणूक काढण्यासाठी ठीक ठिकाणी रांगोळी काढण्यात आली.बघता-बघता गावच्या मंदिरासमोर सर्व ग्रामस्थ व महिला जमा झाल्या.निवृत्त जवान गणवेशात गाडीत उभा झाले.ग्रामस्थांचा उत्साह पाहून तेही भावुक झाले.”भारत माता की जय’ असा जयघोष करीत व वाद्यवृंदांच्या साथीने गावात ही मिरवणूक निघाली.गावातील महिलांनी मिरवणूक सुरू झाल्यानंतर सुभेदार भारत सिरसट यांचे औक्षणही केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वीरमाता जनाबाई पांडूरंग समुद्रे होत्या तर प्रमुख पाहूणे म्हणून सुभेदार ईसेनाईल शेख,धारूर,नायब सुभेदार भारत मोरे,आसोला,नायब सुभेदार चोपडे धारूर,मेजर अजिमोद्दीन शेख,केज,नायब सुभेदार राम राऊत,ॲार्डनरी कॅप्टन अभिमान्यू शिंदे,अंबाजोगाई व सुभेदार बाबुलाल शेख,चिंचपूर,माजी सैनिक सफाऊद्दीन,छावा जिल्हा प्रमुख शिवाजी दादा ठोंबरे,दीपक पवार,माणिक शेळके,पत्रकार सनी शेख,सरपंच कस्तुराबाई पवार यांचेसह गावातील नागरीक महिला,पुरूष व विद्यार्थी बहू संख्येने उपस्थीत होते.
पाहुण्यांच्या हस्ते सुभेदार भारत सिरसटसह पत्नीचा सन्मान झाला.ईश्वर मुंडे यांनी गावातील युवकांनी हा आदर्श समोर ठेवून देश रक्षणासाठी सैन्यात भरती होण्याचे आवाहन केले.गांजपूर हे सैनिकांचे गाव म्हणून ओळखले जाते याचा अभिमान वाटतो असे प्रा.ईश्वर मुंडे यांनी सांगितले.या वेळी मुख्याध्यापक भारत कुरवडे,चि.हर्षद पवार, कु.गिता शिंदे,अभिमान्यू शिंदे,हास्यकवी मेजर अजिमोद्दीन शेख यांनी आपले मनोगत व्यक्त करून हास्य कल्लोळ केला.या वेळी गायकवाड बंधू धारूरकर यांचा देशभक्तीपर गीत गायन कार्यक्रम झाला.कार्यक्रमाचे आभार दिलीप डापकर यांनी तर सुत्रसंचालन अंगद डापकर यांनी केले.