बहीण भावाच्या पवित्र नात्यांना बदनाम करणाऱ्या सुधीर मुनगुंटिवार यांचा बीड तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तीव्र अश्या निच प्रवृत्तीला पाठबळ देणाऱ्या भारतीय जनता पक्षाला मतदानातुन जनताच उत्तर देईल – गणेश बजगुडे पाटील
अश्या निच प्रवृत्तीला पाठबळ देणाऱ्या भारतीय जनता पक्षाला मतदानातुन जनताच उत्तर देईल - गणेश बजगुडे पाटील

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज
बीड / चंद्रपूर लोकसभा मतदार संघाचे भाजपचे उमेदवार तथा महाराष्ट्राचे माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर येथे भारतीय जनता पार्टीच्या प्रचार सभेमध्ये अतिशय गलिच्छ व किळसवाणे वक्तव्य करुन आपल्या विकृत मानसिकतेची व संस्काराची उधळण केलेली आहे. विशेष म्हणजे ही सभा देशाचे माजी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांची होती यासभेमध्ये मुनगंटीवार सारखा एक जबाबदार नेता “अतिशय पवित्र अश्या बहीण भावाच्या नात्यावर गलिच्छ आणि आक्षेपार्ह विधान करतात हे विधान अतिशय चुकीचे असुन बहीण भावाच्या नात्याला काळीमा फासणारे आहे. बीड तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने यावक्तव्याचा तीव्र निषेध व्यक्त करून अश्या निच प्रवृत्तीला पाठीशी घालणाऱ्या भारतीय जनता पक्षाला देशातील जनताच मतदानातुन उत्तर देईल असे सुचक विधान काँग्रेसचे बीड तालुकाध्यक्ष गणेश बजगुडे पाटील यांनी केले आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते वारंवार देशवासीयांच्या भावना दुखावून अपमान करण्याचे काम करत आहेत. यापूर्वी देखील प्रशांत परिचारक यांनी अश्याच प्रकारे चुकीचे वक्तव्य देशरक्षणासाठी सीमेवर काम करणाऱ्या जवानांबद्दल केले होते, मंगलप्रभात लोढा असेल किंवा माजी राज्यपाल भगतसिंग कोषारी असतील यांनी देखील यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरून शिवप्रेमींच्या भावना दुखावण्याचे काम केलेले होते काल पुन्हा अखंड हिंदुस्थानचे दैवत असलेले शंभू महादेव आपल्याकडे महादेवाला शंभु म्हणतात त्याच बरोबर छत्रपती संभाजी महाराजांना देखील शंभूराजे म्हणतात त्यातच भाजपचा श्रीकांत भारती नावाचा आमदार कुत्र्याला शंभु नावाची उपमा देवुन समस्त शिवप्रेमिंच्या भावना दुखावण्याचा काम करतात. अश्या मनोवृत्तीला जाणीवपूर्वक पाठीशी घालण्याचे काम भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून होत आसुन रमेश पाटील नावाचा भाजपचा आमदार विधिमंडळात जाहीर पने सांगतो की आमच्या कडे निरमा वॉशिंग पावडर आहे ती गुजरात वरून येते त्यामुळे आमच्याकडे येणाऱ्या नेत्यांची आम्ही साफ सफाई करून घेतो अश्या प्रकारचे चुकीचे विधान आपण वारंवार पाहत आहोत. कुठलाही विकासाचा मुद्दा नाही, बेरोजगारांसाठी रोजगाराचे व्हिजन नाही, शेतकरी, कष्टकरी सर्वसामान्य नागरिक बेहाल झालेली असताना सत्तेच्या मस्तीत मस्तावल झालेले यानेत्यांची मस्ती उतरवण्याचे काम देशातील जनता येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत मतदानातुन करेल असे गणेश बजगुडे पाटील म्हणाले.