जिवाची वाडी -केज एस.टी.बस वेळ पूर्वीप्रमाणे करा-सचीन भुतडा

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज
येवता: दि.११ जुलै -२०२३केज तालुक्यातील जीवाची वाडी-केज एस.टी.बस सेवा चालू आहे,परंतू काही महिन्यांन पासुन एस.टी.वेळेत बद्धल केल्याने प्रवाशांचे हाल होत असून अडचणीस सामोरे जावे लागत असलेने ,सचीन ओमप्रकाश भुतडा,सचिव,माहेश्वरी सभा,केज तालुका यांनी दि.७ एप्रील-२०२३ रोजी धारूर आगार प्रमुख कार्यालयात जाऊन निवेदन देऊन
एस.टी.बस गाडीची वेळे सकाळी-०९:१५ पूर्वी प्रमाणेच करण्यात यावी जेने करून प्रवाशांच्या अडचणी दुर होतील सध्यस्थिती एस.टी.बस जीवाची वाडी येथे दुपारी१२:३०ते १:०० वा.येते जिवाची वाडी -केज अंतर२२ कि.मी.एवढ्या दुर दुपारी जाऊन कोणतेही काम होत नाही.जर बस गाडीचा पूर्वी प्रमाणे -९वा.वेळ केली तर जीवाची वाडी येथील कर्मचारी शिक्षक व आरोग्य विभागाचे इत्यादी प्रवाशी वंचीत राहात आहेत अशा प्रकारचे निवेदन देऊन केज -जीवाची वाडी-वडवणी हि पण एस.टी.बस सुरू करण्याची भुतडा यांनी समक्ष चर्चा करून लेखी निवेदनाद्वारे मागणी केली असून सर्व प्रवाशांन कडून बस पूर्वी प्रमाणे वेळा पत्रक करण्याची मागणी कानडी, साबला,लव्हूरी, कोल्हेवाडी,येवता,काशीदवाडी व जीवाची वाडी येथील प्रवाशांकडून मोठया प्रमाणावर मागणी होत आहे .
चौकट
आमच्या प्रतिनिधीने विभागीय कार्यालय,बीड येथील विभागीय वाहातुक अधिकारी,संदीप पडवळ यांच्याशी संपर्क केला असता आगार प्रमुखांना मोबाईल फोन वर लाईन घेऊन तात्काळ प्रश्न मार्गी लावण्याचे आदेश दिले आहेत.
चौकट
आमच्या प्रतिनिधीने फोन वरून धारूर आगार प्रमुख,भरत कोमटवार यांना संपर्क केला असता ते म्हणाले की कोणाची मागणी आलेली नाही.