इरा इंग्लिश स्कुलचे वार्षिक स्नेहसंमेलन – 2024 उत्साहात साजरे
शाळेतील विद्यार्थ्यांनी सादर केला नाविन्यपूर्ण कलाविष्कार , पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज विशेष
वैभवशाली महाराष्ट्र न्यूज/प्रतिनिधी
केज तालुक्यातील युसूफवडगांव येथील इरा इंटरनॅशनल इंग्लिश स्कुलचे वार्षिक स्नेहसंमेलन मान्यवरांच्या उपस्थितीतउत्साहात पार पडले.कार्यक्रमाची सुरुवात श्री.बजरंग सोनवणे व सपोनि. मच्छिंद्र शेंडगे यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रतिमा पुजन व सर्व मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून करण्यात आले.यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वागत गीताच्या माध्यमातून सर्व मान्यवराचे शब्दसुमनांनी स्वागत केले.
श्री गणेश वंदना नृत्याने वार्षिक स्नेहसंमेलनाची सुरुवात करण्यात आली.यानंतर सर्व बालगोपालांनी आपआपली नृत्य सादर केले.नर्सरी क्लासच्या विद्यार्थ्यांनी आमच्या पप्पांनी गणपती आणला व लुंगी डांस या गाण्यावर अतिश सुंदर नृत्य सादर केले.एलकेजी विद्यार्थ्यांनी शेतकरी गीत यावर आधारित नृत्य सादर केले.अंगात आलाय देव”या अंधश्रद्धा निर्मूलन वर आधारित नाट्य पर गीत सादर केले.तसेच सर्व विद्यार्थ्यांनी खूप छान पद्धतीने आपापली कला सादर केली व नृत्य अविष्कार सादर केले.कार्यक्रमाची सांगता ही हनुमान चालीसाने करण्यात आली.यावेळी श्रीराम राज्याभिषेक सोहळा देखावा या गीता द्वारे सादर करण्यात आला.या कार्यक्रमास उदघाटक म्हणुन येडेश्वरी कारखान्याचे चेअरमन श्री.बजरंग सोनवणे,कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन पशुवैद्यकिय अधिकारी गुंडाप्पा थळकरी,तर प्रमुख पाहुणे म्हणुन सपोनि श्री.मच्छिंद्र शेंडगे,श्री.उमाकांत आप्पा भुसारी पं.स.सदस्य,डॉ.बंडू मस्के,केंद्रप्रमुख श्री.अर्जुन बोराडे,सरपंच मंगेश गुजर,सरपंच श्री.अंगद इंगळे श्री.राजाभाऊ खरबड,सरपंच श्री.सुरेश नांदे,श्री.सचिन जावळे,श्री.शरद इंगळे,एपीआय श्री.डि.बी वाघमोडे,कांग्रेस तालुकाध्यक्ष श्री.प्रविण खोडसे,श्री.गौरीशंकर आप्पा हालकुडे हे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पाचवीचे विद्यार्थी राघव खंडेलवाल व स्वस्तिका शिंदे यांनी केले तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.बापूसाहेब भुसारी,ॲड.सौ.प्रियंका भुसारी,कु.सारिका सुर्यवंशी,सौ.अंजली तानगे,सौ.पल्लवी कुलकर्णी,कु.श्वेता मोडवे,सौ.प्रियंका थळकरी,अफ्रिन शेख,सौ.योगिता चौधरी,सौ.ज्योती वैरागे,कु.गीता काळे,कु.राधा इरगट,सौ.कल्पना धिमधिमे,श्री.रमेश सौंदने,श्री.लक्ष्मण दोडके व श्री.स्वामी समर्थ प्रतिष्ठान व शिवशक्ती क्रिडा मंडळ यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमास युसूफवडगाव,सादोळा,आवसगाव, सावळेश्वर पैठण येथील ग्रामस्थांनी व पालकांनी मोठ्याप्रमाणात आपली हजेरी लावुन कार्यक्रमास शोभा आणली.