
केज/प्रतिनिधी: नाफेड व महाराष्ट्र फार्मर प्रोड्युसर कंपनी अंतर्गत क्रांतीज्योती ऍग्रो प्रोड्युसर कंपनी यांच्या वतीने केज तालुक्यातील बनसारोळा येथे बुधवारी ( दि २२ मार्च) शासकीय हमीभाव हरभरा खरेदी केंद्राचा शुभारंभ जेष्ठ नागरिक मनोहर गोरे व माजी सैनिक कुंडलिक गोरेमाळी यांच्या हस्ते करण्यात आला.यंदा हरभऱ्याला ५ हजार ३३५ रुपये शासकीय हमीभाव जाहिर करण्यात आल्याने या दराने हरभरा खरेदी होणार आहे.
केज तालुक्यात रब्बी हंगामात हरभरा पिक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते.सध्या काढणी मळणी अंतिम टप्प्यात असतानाच एकरी उत्पादनात मोठीं घट झाली.यातच खुल्या बाजारात व्यापारी ४००० ते ४ हजार ५०० रुपये दराने हरभऱ्याची खरेदी करतात त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत होते.आज हे शासकीय हमीभाव खरेदी केंद्र सुरू झाल्याने पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे.शुभारंभ प्रसंगीं क्रांतीज्योती ऍग्रो प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष दत्ता काकडे, संचालक गिल्डा यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेतकरी बांधवांनी ७/१२ उतारा,आधारकार्ड, बॅंक पासबुक येथे देऊन आपले नाव ऑनलाईन नोंदणी करून घ्यावे,आणि कंपनीकडून एसएमएस आल्यानंतर शेतकऱ्यांनी माल विक्रीसाठी खरेदी केंद्रावर आणावा असे आवाहन क्रांतीज्योती ऍग्रो प्रोडूसर कंपनीचे अध्यक्ष दत्ता काकडे यांनी केले आहे.