ऍड.शिवाजी कांबळे यांची नोटरीपदी नियुक्ती

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
येथील प्रख्यात विधीज्ञ ऍड.शिवाजी देवाजी कांबळे यांची भारत सरकारच्या वतीने नोटरीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भारत सरकारच्या विधी व न्याय मंत्रालयाच्या वतीने त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याबद्दल सर्वस्तरांतून ऍड.कांबळे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
केंद्र सरकारच्या विधी व न्याय विभागातर्फे नोटरीपदी निवड करण्यात करण्यात आलेल्या यादीमध्ये ऍड.शिवाजी देवाजी कांबळे यांच्या नांवाचा समावेश आहे. ऍड.कांबळे यांना मागील १८ वर्षांपासून वकिली व्यवसायाचा अनुभव आहे. तसेच ते सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असतात. त्यांच्या या निवडीबद्दल सहकारी मित्र, परिवार यासह विविध संस्थांचे तसेच संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे. ऍड.कांबळे हे अंबाजोगाई येथील दिवाणी व फौजदारी तसेच जिल्हा व सत्र न्यायालय येथे विधीज्ञ म्हणून कार्यरत आहेत. कायदेशीर दस्तऐवजांवर स्वाक्षरी करण्यासाठी अधिकृत व्यक्ती म्हणून नोटरी हे फार महत्त्वाचे आहे. व्यवहार योग्य रीतीने पार पाडले जातील, याची खात्री करण्यासाठी आणि फसवणूक रोखण्यासाठी कायदेशीर कागदपत्रे नोटरी केली जातात. भारत सरकारच्या विधी व न्याय मंत्रालयाने नोटरीचे प्रमाणपत्र देऊन नोटरीपदी निवड केली. नियुक्तीचे रितसर प्रमाणपत्र त्यांना प्राप्त झाले आहे. ऍड.शिवाजी देवाजी कांबळे यांची नोटरीपदी नियुक्ती करण्यात आल्याबद्दल बीड जिल्ह्यातील जनतेतून सहर्ष स्वागत होत आहे.
*पदाचा वापर समाजासाठी करणार :*
मला मिळालेल्या नोटरी पदाचा वापर हा आगामी काळात समाज हितासाठी व सर्व नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी केला जाईल.
*- ऍड.शिवाजी कांबळे (नवनियुक्त नोटरी)*