रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडीया (आठवले) दिव्यांग आघाडी बीड जिल्हाध्यपदी शाहू डोळस यांची निवड

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज
बातमी संकलन – विनोद शिंदे (बीड)
बीड (प्रतिनिधी) दिनांक 23/02/2025 रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडीया (आठवले) माध्यमातुन बीड जिल्ह्यात गेल्या तिस वर्षापासून बीड जिल्ह्यात निराधार, अत्याचारीत, पीडीत दिव्यांग महिला तसेच चळवळी मध्ये कार्यरत राहुन आनेक आंदोलने करून दिन दलीत महीला तसेच दिव्यांग बांधवांना न्याय मिळवुन देण्याची धडपड पाहून त्यांनी केलेले सामाजीक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य व चळवळीत कार्यरत आसतांना दिन दलीत, निराधार, शोषीत पिडीतांना न्याय देण्यासाठी गेल्या तिस वर्षापासूनचा अविरत संघर्ष याची दखल घेवुन रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडीयाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजीक न्याय राज्य मंत्री मा. ना. रामदासजी आठवले साहेबांच्या आदेशावरून युवक रिपाई महाराष्ट्र अध्यक्ष पप्पुजी कागदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली रिपब्लीकन पार्टी च्या दिव्यांग आघाडीचे प्रदेश अध्यक्ष मा. सुरेशजी माने पाटील यांनी शाहू नारायण डोळस रा. चऱ्हाटा, ता.जि.बीड यांची बीड जिल्हा रिपब्लीकन पक्षाच्या दिव्यांग आघाडीच्या बीड जिल्हा अध्यक्षपदी निवड केली. या निवडीचे नियुक्तीपत्र रिपब्लीकन पक्षाच्या जिल्हा मध्यवर्ती कार्यालयामध्ये युवक रिपाई महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा. पप्पुजी कागदे साहेब, रिपब्लीकन पक्षाच्या दिव्यांग आघाडीचे प्रदेश अध्यक्ष मा. सुरेशजी माने पाटील यांच्या हस्ते शाहूराव डोळस यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी रिपाई जिल्हा सरचिटणीस राजुजी जोगदंड रिपाई बीड तालुका अध्यक्ष किसन तांगडे रिपाई गेवराई ता. अध्यक्ष किशोर कांडेकर, युविक रिपाई बीड तालूका अध्यक्ष सुभाष तांगडे, माजी सरपंच नागेश शिंदे, रिपाई शहर अध्यक्ष अविनाश जोगदंड, रिपाई पिंपळनेर सर्कल अध्यक्ष सतिष शिनगारे, आप्पा मिसळे, राहुल कोरडे, बाबुराव भालेराव, विजय साबळे, दिलीप ससाने, भागवत साबळे, श्रीरंग वाघमारे, प्रकाश ससाने, राजाभाऊ शिंदे, प्रविण सोनवणे, नानासाहेब धन्वे, संजय शिंदे, नितीन शिंदे, सुंदर वाघमारे, नितीन सोनवणे आदींची उपस्थीती होती. सर्व स्तरातून शाहू डोळस यांच्या अभिनंदन होत असून, पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.