अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज संस्थानच्या वतीने केज तालुका येथे विनामूल्य ॲम्बुलन्सचा लोकार्पण सोहळा संपन्न
गणेश नांदे यांच्या यशस्वी नियोजनातुन कार्यक्रम संपन्न

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज
सामाजिक, सांस्कृतिक विशेष
केज प्रतिनिधी; – ता. 28 रोजी अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या सामाजिक उपक्रमांतर्गत केज येथे विनामूल्य ॲम्बुलन्सचा लोकार्पण सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला.
आज जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांचे कार्य सध्या सर्वश्रुत आहे यांच्या कार्याच्या मार्फत सत्तर टक्के सामाजिक कार्य व तीस टक्के आध्यात्मिक कार्य या संस्थांच्या माध्यमातून केले जाते त्याच्यामध्ये विनामूल्य ॲम्बुलन्स या वेगवेगळ्या दहा राष्ट्रीय महामार्गावर 53 ॲम्बुलन्स संस्थांच्या माध्यमातून चालत आहेत विनामूल्य सेवा या ॲम्बुलन्सच्या माध्यमातून केली जाते आज पर्यंत जवळजवळ 25900 हजार लोकांचे प्राण या अंबुलन्स ने वेगवेगळ्या ठिकानी वाचवलेले आहेत. आत्ताच जानेवारी चार ते जानेवारी 19 दरम्यान या पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये संस्थांच्या माध्यमातून रक्तदान शिबिरे झाले बाराशे अठ्ठेचाळीस रक्तदान शिबिराच्या माध्यमातून एक लाख छत्तीस हजार दोनशे सत्तर रक्तकुपिकेचे संकलन महाराष्ट्र शासनाला संस्थांच्या माध्यमातून सुपूर्द करण्यात आलं, त्यानंतर आजता गायत संस्थांच्या माध्यमातून 84 डेड बॉडी वेगवेगळ्या मेडिकल कॉलेजला सुपूर्द करण्यात आल्या, बारा अवयव दान संस्थांच्या माध्यमातून देण्यात आले, गोरगरिबांना अन्नधान्याचा वाटप असेल, शेतकऱ्यांना कृषी साहित्य, गाय, म्हशी, शेळीचं वाटप असेल, फवारणी पंपाचे वाटप असेल विधवा, परितक्त्या व निराधार महिलाना शिलाई मशीनचे वाटप असेल, वेगवेगळ्या शाळांना शालेय शिक्षण साहित्यच वाटप असेल असे समाज उपयोगी वेगवेगळे बरेच कार्य या संस्थांच्या माध्यमातून केले जाते, तसेच आजही संस्थांच्या माध्यमातून केज येथे ॲम्बुलन्स गाडी चा लोकार्पण सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला.
त्यासाठी उपस्थित केज विधानसभा मतदारसंघाचे आमदार, सौ. नमिताताई अक्षय मुंदडा, डॉ केंद्रे साहेब डॉ नागरगोजे साहेब नगराध्यक्षा सीताताई बनसोड, हारून भाई इनामदार सूत गिरणीचे चेअरमन श्री. विजयप्रकाश ठोंबरे, नगरसेवक श्री.रणजीत भैय्या आडसकर,व्यापारी महासंघ अध्यक्ष महादेवराव सुयवंशी, शीतल ताई लांडगे कपिल मस्के शरीफ भैय्या शेख, श्री. मोहनराव धपाटे, श्री. शिवाजीराव ठोंबरे, श्री. शरद इंगळे, श्री. नेताजी शिंदे, श्री भगवान केदार, भैया शिंदे श्री. शाम रोडगे याच बरोबर स्व – स्वरूप सांप्रदाय जिल्हा सेवा समिती बीड व तालुका सेवा समिती केज. यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले.