आपला जिल्हाआरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

मराठी भाषा ही लोकभाषा होण्याची गरज – बिपीनदादा क्षीरसागर

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज

समृद्ध महाराष्ट्राच्या सर्वांगीण बातम्यांसाठी ..

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज मिडिया

अंबाजोगाई (प्रतिनिधी)

येथील खोलेश्वर महाविद्यालयात मराठी विभागाच्या वतीने गुरूवार, दिनांक २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला.

 

या कार्यक्रमाची सुरूवात मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजनाने तसेच स्वागत गीताने झाली. मराठी भाषा गौरव दिन हा कार्यक्रम कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त महाविद्यालय मध्ये साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून बिपीनदादा क्षीरसागर होते. व्यासपीठावरून बोलताना ते म्हणाले की, कुठली ही भाषा एकमेकांतील संवादाशिवय असू शकत नाही म्हणून आपल्यातील भावना दुसऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी भाषा हे माध्यम आहे. ही भाषा प्रामुख्याने व्यापाराच्या माध्यमातून संबंधातून प्रस्थापित होते. आपल्या गरजा दुसऱ्याच्या गरजा समजून घेण्यासाठी दोन भाषांची गुंफणीकरण केले जाते. भाषा ही तयार कशी होते याविषयी त्यांनी सविस्तर माहिती दिली. माणसाची जात जोपर्यंत आहे. तोपर्यंत भाषा बदलणार नाही असे ही मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. या मराठी भाषेमध्ये काही शब्द बदलले जातील पण भाषा बदलणार नाही आणि ती जगाच्या अंतरापर्यंत टिकेल आपण जी भाषा बोलतो तेव्हा ती भाषा निर्दोष असेलच असे नाही. ते पुढे म्हणाले की, भाषेवर आपले प्रभुत्व असणे काळाची गरज आहे. जगामध्ये २०० च्या वर देश आहेत. या देशात असणारी भाषा ही वेगवेगळी आहे. त्यामुळे ज्या- ज्या लोकांनी जिथे वास्तव्य केले तिथे भाषेची निर्मिती झाली. मराठी भाषा ही दोन ते तीन हजार वर्षांपूर्वीची आहे असे मत त्यांनी मांडले. त्यांनी गाथा सप्तसती या गाथेतील असणाऱ्या भाषेच्या बाबतीत माहिती सांगितली. पुढे बोलताना म्हणाले की, भाषा आणि इतिहास एकमेकांच्या हातात हात घालून चालतात त्यामुळे समाजातील तत्कालीन प्रतिबिंब ही भाषा आहे मराठी भाषा टिकविणे ही समाजाची मोठी जबाबदारी आहे. ती भाषा समाजाभिमूख कशी होईल याचा विचार समाजातील लोकांनीच करावा म्हणून देशामध्ये भाषेनुसार प्रांत रचना केली त्यामुळे महाराष्ट्रातीला असलेल्या मराठी भाषा विषयक धोरण काय असले पाहिजे याविषयी त्यांनी माहिती दिली मराठी भाषा ही मृत्त होऊ लागली की काय..? असे वाटू लागले आहे. इंग्रजी भाषा ही एक ज्ञानभाषा आहे. असे समाजाला वाटू लागले आहे म्हणून मराठी भाषा ही दुय्यम दर्जाची आहे असा गैरसमज मराठी भाषेबद्दल निर्माण झाला की काय असे वाटत आहे. म्हणजेच मराठी भाषा ही महत्त्वाची नाही. असे समाजाला वाटत आहे. परंतु, मराठी भाषेचे प्रभुत्व वाढविण्यासाठी या भाषेचा आग्रह समाजातील सर्व लोकांनी धरणे अत्यंत आवश्यक आहे मराठी भाषेला अभिजात दर्जा कसा मिळाला त्याविषयी निकष व माहिती सांगितली संस्कृत भाषेचा आधार घेतल्याशिवाय अर्थ प्राप्त होत नाही तुमची भाषा प्राचीन आहे म्हणजे अभिजात दर्जा मिळेल. पण, मराठी भाषा लोकभाषा होण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. मराठी भाषेचा आग्रह आपल्या घरापासून झाला पाहिजे या भाषेचा तंत्रज्ञानमध्ये वापर होईल का याचा विचार करावा लागेल. मराठी भाषेचा उपयोग अधिक कसा व्हावा यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत, त्या दिवसापुरते मराठी भाषेचा गौरव दिन साजरे करणे एवढ्या पुरतेच मर्यादित न राहता मराठी भाषा लोकांपर्यंत आत्मसात कशी होईल यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे मराठी भाषे विषयीचे ज्ञान समाजापर्यंत पोहोचेल तेव्हा खऱ्या अर्थाने आपण मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्याला महत्त्व राहील. शेवटी बोलताना म्हणाले की, आपण भाषा सैनिक म्हणून काम केले तर खऱ्या अर्थाने आपण मराठी भाषा गौरव दिन साजरा केला असे वाटेल. असे ते म्हणाले. या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भा.शि.प्र.संस्थेचे स्थानिक व्यवस्था मंडळाचे अध्यक्ष विजय वालवडकर हे होते. याप्रसंगी त्यांनी आपले मत मांडताना म्हणाले की, मराठी भाषा ही मर्यादित असता कामा नये ती भाषा बोलण्यामध्ये व लिहिण्यामध्ये भाषेचे सौंदर्य असले पाहिजे. मराठी भाषेचा व्यवहारामध्ये कसा उपयोग होईल याचा विचार करावा मराठी भाषा शुद्ध कशी होईल हे पहावे तसेच मराठी भाषेसाठी महाविद्यालय म्हणून आपणांस काही योगदान देता येईल का..? त्यासाठी पुढचे पाऊल टाकणे काळाची गरज आहे असे मत त्यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती म्हणून महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.प्रीती पोहेकर या होत्या तसेच या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.बिभीषण फड, उपप्राचार्य डॉ.दिपक फुलारी, उपप्राचार्य प्रा.आनंद पाठक, उपप्राचार्य डॉ.रवींद्र कुंबेफळकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु.शिवकन्या शिंदे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉ.देविदास खोडेवाड यांनी केले तर उपस्थितांचे आभार मराठी विभागाचे प्रा.गौतम गायकवाड यांनी मानले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक बंधू, भगिनी तसेच विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रम प्रसंगी मराठी विभागाच्या विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या भितीपत्रकाचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.