ज्योतीराम सोनके राज्यस्तरीय यशवंतरत्न पुरस्काराने सन्मानित
सामाजिक कार्याची राज्यस्तरीय पुरस्काराने दखल

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
सन्मान कर्तृत्वाचा सामाजिक कार्याचा
कळंब (प्रतिनिधी) विद्याभवन हायस्कूल कळंब चे सहशिक्षक तथा ग्रामशक्ती वेल्फेअर फाउंडेशन अंबाजोगाईचे अध्यक्ष ज्योतीराम सुभाष सोनके यांना बीड येथील जय मल्हार सामाजिक प्रतिष्ठानतर्फे राजे यशवंतराव होळकर यांच्या जयंतीचे औचित्य साधत सामाजिक, व शैक्षणिक कार्याची दखल घेत त्याना यशवंतरत्न पुरस्कार देऊन बीड येथे सन्मानित करण्यात आले.
होळकरांच्या वंशजांकडून सन्मान
राजे यशवंतराव होळकर यांच्या जयंती निमित्त बीडमधील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात कार्यक्रमाचे उद्घाटक माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर व इंदोर येथील होळकर घराण्याचे वंशज श्रीमंत भूषणसिंहराजे होळकर यांच्या हस्ते राज्यस्तरीय यशवंतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ज्योतीराम सोनके यांनी सहकुटुंब, सहकारी विठ्ठल कोकाटे, सतीश तोडकर, नेहरू युवा केंद्र बीडचे लेखाधिकारी नाना पाटील साहेब, सुभाषराव सोनके, विमल सोनके, सावत गोरे माळी, सुमन खडबडे यांचेसह मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. सर्जेराव काळे, स्वागताध्यक्ष विष्णू देवकाते, प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. राजेंद्र गाडेकर, डॉ. योगेश क्षीरसागर , अंकुशराव येळे, हे उपस्थित होते.