उंदरी येथे शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा
छत्रपती शिवजयंती उत्सव 2023

. केज प्रतिनिधी
तालुक्यातील मौजे उंदरी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती ( शिवजन्मोत्सव) ” मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
प्रतिवर्षाप्रमाणे या वर्षीही रयतेचे राजे अखंड भारताचे प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त १९ फेब्रुवारी रोजी सकाळी छत्रपतींच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त शिवव्याख्याते प्रा.उगले आर.आर यांचे शिव व्याख्यान संपन्न झाले. सध्याच्या युगात शिवरायांसारख्या तलवारीच्या लढाया करायच्या नाहीत तर पेणच्या लढाया लढायच्या आहेत म्हणून मुलांना शिकवा,एक वेळ जमिनी विका पण मुलांना शिकवा हा संत श्रेष्ठ भगवान बाबांचा संदेश लक्षात घ्या शिक्षणाने माणसांचे पशुत्व नाहीसे होते,म्हणून मुलांना शिकवा असा विचार आपल्या व्याख्यानातून त्यांनी दिला.शेवटी आई वडिलांनी मुलांवर चांगले संस्कार करा म्हणजे पिढ्या सुधारतील असा आशावाद व्यक्त केला.
यावेळी छावा जिल्हाप्रमुख शिवाजी दादा ठोंबरे,चेअरमन नितीन ठोंबरे,संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष प्रवीण ठोंबरे, उमेश फांमदे, प्रमोद ठोंबरे, लक्ष्मीकांत ठोंबरे,दिनेश ठोंबरे,अशोक ठोंबरे, जिजाराम ठोंबरे, उद्धव ठोंबरे, समाधान ठोंबरे, विजय ठोंबरे,केशव ठोंबरे,विलास ठोंबरे यांच्यासह सार्वजनिक जयंती उत्सव समिती,तरुण मित्र मंडळ व गावकरी उपस्थित होते.