आदर्श शिक्षिका स्व मिराताई गोविंद शिनगारे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिम्मित महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध किर्तनकार रामायणाचार्य नाना महाराज कदम यांचे आवसगाव येथे किर्तनाचे आयोजन
आदर्श शिक्षिका तथा राष्ट्रमाता जिजाऊ बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा , कुटुंबातील प्रेरणादायी व्यक्तीमत्व म्हणुन ज्यांनी आपलं आयुष्य वेचले आशा स्व. मीराताई गोविंद शिनगारे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिम्मित उपस्थित राहण्याचे आवाहन

वैभवशाली महाराष्ट्र न्युज नेटवर्क
वैभवशाली महाराष्ट्र प्रतिनिधी
केज तालुक्यातील मौजे आवसगाव येथे सम्राट अशोक मा. विद्यालयाच्या माजी आदर्श शिक्षिका , राष्ट्रमाता जिजाऊ बहुउद्देशीय सेवाभावी संस्था आवसगावच्या संस्थापक अध्यक्षा व सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते गोविंद नाना शिनगारे यांच्या सुविद्य पत्नी स्व मिराताई गोविंद शिनगारे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिम्मित महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध किर्तनकार तथा रामायणाचार्य नाना महाराज कदम (श्रीगुरु बंकटस्वामी संस्थान नेकनुर) यांच्या किर्तन सेवेचे आयोजन शुक्रवार दिनांक 30/9/2022 रोजी सकाळी 10 ते 12 या वेळेत करण्यात आले असुन याप्रसंगी पंचक्रोशीतील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी तसेच नागरिकांनी व शिनगारे परिवाराच्या सानिध्यात असलेल्या सर्व मित्र मंडळी यांनी स्व. मीराताई गोविंद शिनगारे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिम्मित आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन गोविंद (नाना) शिनगारे , संतोष शिनगारे , लक्ष्मण शिनगारे , सुनिल शिनगारे , दत्तात्रय शिनगारे , व समस्त शिनगारे परिवार आवसगाव ता.केज जिल्हा बीड यांच्या वतीने करण्यात आले आहे