आपला जिल्हावैभवशाली महाराष्ट्र न्युजसामाजिकसांस्कृतिक

परमात्मा विश्वाच्या रूपाने नटलेला आहे  -ह .भ. प .  दत्ता महाराज अंबीरकर

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज विशेष

कळंब  :-  परमात्मा अनंतकोटी ब्रम्हांडनायक आहे तो देश ,वस्तू ,काळ असा विश्वव्यापकच नव्हे तर विश्वाच्या रूपाने नटलेला आहे, त्याच्या सानिध्यात राहणारा कृतार्थ होतो असे विचार प्रसिद्ध कीर्तनकार ह. भ .प . दत्ता महाराज आंबीरकर  यांनी दक्षिण मुखी हनुमान मंदिर कसबा पेठ येथे 6 एप्रिल चैत्री पौर्णिमा निमित्त हनुमान जन्मोत्सवानिमित्त आयोजित हरिनाम सप्ताहामध्ये काल्याचे किर्तन करीत असताना व्यक्त केले याप्रसंगी ह .भ. प. दत्ता महाराज अंबीरकर  यांनी आपल्या कीर्तन सेवेसाठी संत तुकाराम महाराजांचा अनंत ब्रह्मांड उदरी ….. हरी हा बालक नंदा घरी …..नवल ते केवढे … केवढे…..
नकळे कान्होबाचे कोडे   तुका म्हणे…..
 नटदारी भोग भोगूनी ब्रह्मचारी ,  या पाच चरणाच्या अभंगावर निरोपण केले त्यांनी या अभंगातून भगवान श्रीकृष्णाच्या यशोदा मातेस ब्रह्मांड दर्शन व गोपगोपी यांच्या सोबतच्या लीला सांगितल्या व संत तुकाराम महाराजांनीही भगवंताच्या लीलाचे नवल वाटते व हे सर्व काही न सुटणारे कोडे वाटते असे विवेचन करू  गावरान गाय ही उपयुक्त पशु आहे प्रत्येकाच्या दारात असावी व ती सांभाळायला हवी  गाय की शेती ,आरोग्य, विज्ञानात उपयुक्त आहे असे  सांगितले याप्रसंगी मार्गदर्शक देवाची आळंदी येथील जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे ह .भ. प .ज्ञानसिंधू संदिपान महाराज हांसेगांवकर यांची उपस्थिती होती त्यांनी या प्रसंगी वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसाराची गरज प्रतिपादन करून शिक्षणा बरोबर संस्कार काळाची गरज असल्याचे सांगून किर्तन सेवा करीत असताना काही नियम व क्रम प्रसंग महत्त्वाचे असतात  याविषयी माहिती दिली, तेर, धाराशिव जिल्ह्य येथे संतश्रेष्ठ गोरोबाकाका देवस्थान सोहळ्यातील आयोजित कार्यक्रमास उपस्थिती लावण्याचे आवाहन केले व कळंब दक्षिणमुखी हनुमान मंदिर सप्ताह समितीच्या वतीने गेली तेवीस वर्ष अखंड हरिनाम सप्ताह होत आहे याबद्दल आनंद व्यक्त केला . कार्यक्रमानंतर माजी नगराध्यक्ष शिवाजी (आप्पा) कापसे यांच्या वतीने भोजन (महाप्रसाद) पंगतीचे आयोजन करण्यात आले. हनुमान जन्मोत्सव तसेच हरिनाम सप्ताह यशस्वी करण्यासाठी चत्रभुज चोंदे, काका चोंदे, पांडुरंग माळवदे शिंदे गुरुजी, बंडू मुंडे,आप्पा हाजगुडे, पांडुरंग सुगडे,गणेश कुरुंद, अॕड,दिलीपसिंह देशमुख, भागवत चोंदे, काशिनाथ घुले,मनोहर हारकर, दीपक बोराडे ,रघुनाथ चोंदे,रामदास जाधव, नागनाथ शेंडगे, काशिनाथ घुले, बंडूपंत जोशी, शिवाजी भाकरे, सुभाष फाटक, नागनाथ माळी, यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमात महिला पुरुष भक्तांची मोठी गर्दी होती.
Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.