आपला जिल्हामहाराष्ट्रराजकीय
मराठवाडा मुक्तीसंग्राम होऊन 68 वर्ष पूर्ण तरीही मराठवाडा आर्थिक, शैक्षणिक व पर्यटन विकासापासून वंचित- मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी शिवसेनेचे प्रा. महादेव पुरी यांची शासनाकडे खंत

लातूर जिल्हा
मराठवाड्यातील 8 जिल्हे, 78 तालूके व 63 बाजारपेठा , अनेक तीर्थक्षेत्र आहेत. पण कोणत्याही जिल्ह्यात मनावा तसा आर्थिक, शैक्षणिक, तसेच पर्यटन विकास झाल्याचे निदर्शनास येत नाही. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी माननीय मुख्यमंत्री, तसेच उपमुख्यमंत्री यांनी वरील मुद्द्यावर मराठवाड्याचा सखोल अभ्यास करून लवकरात लवकर मराठवाड्याच्या विकासाला चालना द्यावी अशी विनंती मुख्यमंत्र्याकडे आपण करत असल्याचे प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून सांगितले. मराठवाड्यात दरडोई उत्पन्न जास्त कसे वाढवता येईल यावर शासनाने लक्ष केंद्रित करावे असेही त्यांनी सांगितले.