सावळेश्वरचे समाजप्रिय व्यक्तिमत्व डॉ शिवाजी मस्के यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य तपासणी
डॉ शिवाजी मस्के यांना वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांनी दिल्या शुभेच्छा

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज
केज प्रतिनिधी (महादेव दौंड)
केज तालुक्यातील मौजे सावळेश्वर (पै) येथील भुमिपुत्र तथा मागील अनेक वर्षांपासून आरोग्य क्षेत्रात आरोग्यसेवा ग्रामीण भागातील जनतेला अविरत देणारे समाजप्रिय व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची पंचक्रोशीत विशेष ओळख आहे असे मा.श्री डॉ शिवाजी मस्के यांच्या वाढदिवसानिमित्त दि.7/9/2024 रोजी तालुक्यातील सारणी आनंदगाव येथील पुरुषोत्तम दादा सोनवणे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय , व्यंकटेश , राजलक्ष्मी , ज्योती बालसदन मधील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी डॉ शिवाजी मस्के यांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात आली .
पावसाळ्याच्या दिवसात अनेक आजारांचे परिणाम सर्वत्र दिसून येतात यामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांनाही काही व्हायरल आजार दिसून येतात व जे निवासी विद्यार्थी असतात त्यांचीही आरोग्य तपासणी वेळोवेळी होणे गरजेचे असते याच अनुषंगाने मौजे सावळेश्वर येथील मातोश्री क्लिनिकच्या माध्यमातून तालुक्यातील नागरिकांना आरोग्याच्या दृष्टीने चांगली सेवा देणारे डॉ शिवाजी मस्के यांचे नाव सर्वत्र सुपरिचित आहे आणि आज स्वताच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करून योग्य औषधोपचार देऊन सामाजिक उपक्रम राबविण्यात आला व विद्यार्थ्यांना आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले यावेळी आरोग्य तपासणी प्रसंगी संस्थेचे सचिव तथा बीड जिल्ह्याचे नेते राहुल सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली सदरील उपक्रमाचे आयोजन करण्यात आले यावेळी डॉ शिवाजी मस्के यांचा यथोचित सत्कार करुन वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या यावेळी श्री रवि सोनवणे , शाळेचे मुख्याध्यापक पी.एच . लोमटे , डॉ सचिन साखरे , लॅब टेक्निशियन गणेश मस्के यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते .