दर्शनासाठी येणाऱ्या भाविक भक्तांची गैरसोय टाळा – संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष प्रविण ठोंबरे
तहसीलदार व देवल कमेटीला संभाजी ब्रिगेडचे निवेदन

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज
अंबाजोगाई (वार्ताहर)
राज्यासह शहर व तालुक्यातून श्री माता योगेश्वरी देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविक भक्तांची गैरसोय टाळा, दर्शनाशस्थळी सर्व भाविक भक्तांना समान दृष्टीने पहावे अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष प्रविण उत्तमराव ठोंबरे यांनी अंबाजोगाईचे तहसीलदार व देवल कमेटीला संभाजी ब्रिगेडच्या वतीने शुक्रवार, दिनांक ४ ऑक्टोबर रोजी दिलेल्या निवेदनातून केली आहे.
सदरील निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, श्री माता योगेश्वरी देवस्थान मंदिरामध्ये देवीच्या दर्शनसाठी येणाऱ्या सर्व भाविक भक्तांची माता योगेश्वरी देवस्थान कमेटीकडून गैरसोय होत आहे. व सर्व भक्तांना दर्शनासाठी समान न्याय दिला जात नाही. पोलीस प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. पोलीस प्रशासनाचे कर्मचारी निवांत खुर्चीवर बसुन राहत आहेत. सामान्य भाविक भक्तांना कोणीही वाली नाही, सामान्य जनतेसाठीच दर्शानाची रांग आहे. तर तथाकथित मोठ्या लोकांना अजिबात रांगेत उभे राहण्याची गरज नाही असे दिसून येत आहे. यामुळे सामान्य जनतेला याचा खूप मोठा त्रास सहन करावा लागतोय. त्याची खबरदारी श्री योगेश्वरी देवस्थान कमेटी व पोलीस प्रशासनाने घ्यावी. अन्यथा संभाजी ब्रिगेडकडून याप्रश्नी आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. सदरील निवेदनावर संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष प्रविण उत्तमराव ठोंबरे, जिल्हा उपाध्यक्ष, परमेश्वर मिसाळ, जिल्हा सचिव नारायणराव मुळे, विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष केशव टेहरे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष अश्विनी यादव, तालुकाध्यक्ष सुनंदा लोखंडे, संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष सिद्राम यादव, विद्यार्थी आघाडीचे तालुकाध्यक्ष सतिश कुंडगर, शहराध्यक्ष रोहन कुलकर्णी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.