मुख्याध्यापक व माध्यमिक शिक्षणाधिकारी यांची सहविचार सभा संपन्न
शाळेत सी. सी. टीव्ही व तक्रार पेटी सक्तीने बसवून घ्या -- मा माध्यमिक शिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे

बीड /प्रतिनिधी (डॉ जावेद शेख)
बीड चे माध्यमिक शिक्षणाधिकारी व जिल्ह्यातील सर्व मुख्याध्यापक यांची लॉर्ड बेडन पॉवेल स्काऊट भवन बीड येथे सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले होते.
या सहविचार सभेत मार्गदर्शन सूचना करत असताना माध्यमिक शिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांची सुरक्षा सर्वोतोपरी असल्याने या उपाययोजनेशी तडजोड करता येणार नाही.अस्तित्वात असलेल्या उपाययोजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी तसेच संदर्भीय शासन निर्णयाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील त्या करीता या सहविचार सभेचे आयोजन आयोजन करण्यात आले होते.बदलापूर जि. ठाणे येथील घडलेल्या घटनेची माहिती सांगून आपल्या शाळेत सी.सी. टीव्ही व तक्रार पेटी याची अमलबाजवणी दिनांक 21ऑगस्टच्या2024 च्या शासन निर्णया नुसार करणे गरजेचे असल्याचे स्पष्ट सूचना दिल्या.आपल्या शाळेचा संपूर्ण परिसर व सर्व वर्ग खोल्यात सी.सी.टिव्ही लावणे आवश्यक आहे .तसेच आपल्या शाळेत तक्रार पेटी लावून आठवड्यात दोन ते तीन दिवसाने उघडून त्याचा अहवाल सर्व शाळेने ठेवणे आवश्यक आहे. जेणेकरून शाळेतील विध्यार्थी व विध्यार्थिनी यांच्या तक्रारींचे निवारण करता येईल. तसेच सखी सावित्री समिति गठीत करून या समिती मार्फत आपल्या शाळेत आरोग्य शिबिर , बालविवाह रोखणे ,इत्यादी कार्यक्रम राबवता येतील .या समितीची महिन्यातून एकदा मीटिंग आयोजित करावे .तसेच या समितीचे अहवाल केंद्रिय समितीला प्रत्येक महिन्याला 10 तारखेपर्यंत देणे आवश्यक आहे. सर्व शाळेत 21 सप्टेंबर च्या अगोदर सी.सी.टिव्ही बसून घ्यावे अन्यथा शासनाच्या शासन निर्णयानुसार शाळेची मान्यता रद्द करण्यात येईल. त्यामुळे सर्व शाळेत याची सक्तीने अमलबजावणी करून घेणे गरजेचे आहे.या वेळी शिक्षण विस्तार अधिकारी काकडे, हजारे , व जिल्ह्यातील मुख्याध्यापक , शालेय समितीचे अध्यक्ष मोठ्या संख्येने उपस्थित होते.