गजानन सहकारी साखर कारखान्याचे रोलिंग पुजन संपन्न
डी.व्हि.पी.ग्रुपचे मा.श्री.अभिजीत आबा पाटील यांनी गजानन साखर कारखाना चालवायला घेतला

बीड ( प्रतिनिधि ) :दिनांक ९ सप्टेबंर: बीड तालुक्यातील नवगण राजुरी येथे लोकनेत्या स्वर्गीय केशरकाकु क्षिरसागर यांनी शेतकऱ्यांना वरदान ठरलेल्या गजानन सहकारी साखर कारखान्यानी उभारणी केली होती परंतु मागील काही वर्षापासून काही तांत्रीक अडचणीमुळे हा कारखाना बंद होता.परंतु हा कारखाना चालु व्हावा असे स्वप्न चेअरमन मा.श्री.रविंद्र दादा क्षिरसागर यांचे होते.त्यांचे स्वप्न त्यांचे चिरंजीव बीड विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तरूण तडफदार आमदार मा.श्री.संदिपभैय्या क्षिरसागर यांनी अखेर प्रत्यक्षात खरे करून दाखवले आहे.हा कारखाना डी.व्हि.पी.ग्रुप पंढरपूर चे संचालक मा.श्री.अभिजीत आबा पाटील यांनी भाडेतत्वावर चालवायला घेतला .अभिजीत आबा पाटील व बीड जिल्ह्याचे जुनेच नाते आहे.ते केज येथिल राष्ट्रीय काँग्रेंस पक्षाचे जिल्हाउपाध्यक्ष मा.श्री.सुरेश तात्या पाटील यांचे ते जावई आहे.त्यांनी शुक्रवार दिनांक ९ सप्टेबर रोजी गजानन साखर कारखान्याचे रोलिंग पुजन करुन कारखाना सुरू करण्याचे संकेत दिले.या रोलिंग पुजन समाऱभास डी.व्हि.डी.ग्रुप धाराशिव चेएम.डी.मा.श्री.अमर भैय्या पाटील,गजानन चेअरमन मा.श्री.रविंद्र दादा.क्षिरसागर,बीड चे आमदार.मा.श्री.संदिपभैय्या क्षिरसागर मा.श्री.सुरेश तात्या पाटील केजकर,डी.व्ही.पी.ग्रुपचे संचालक मा.श्री.भागवत चौघुले,मा.श्री.सुहास भैय्या शिंदे,मा.श्री.हेमंत भैय्या क्षिरसागर,मा.श्री.आर्जुन भैय्या क्षिरसागर,यांची उपस्थिती होती.रोलिंग पुजना नंतर आ.संदिपभैय्या क्षिरसागर यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही कारखाना सुरू करत आहोत यांचा आम्हाला आनंद झाला व माझ्या वडिलांचे स्वप्न पूर्ण झाले .असे भावनिक उदगार काढले.या नंतर काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते मा.श्री.सुरेश तात्या पाटील यांनी मारगर्दशन करताना.शेतकऱ्यांनी उसाची रिकव्हरी चांगली द्यावी असे अहवान केले.या प्रसंगी गजानन सहकारी साखर कारखान्याचे सर्व आधिकारी,सर्व कर्मचारी, व बहुसंख्य उस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.
**********